विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजविणे आवश्‍यक : कोविंद

पुणे – पुणे शहर हे शैक्षणिक क्षेत्रात कायमच देशाच्या आणि राज्याच्या केंद्रस्थानी राहिले आहे. पुरोगामी विचारसरणीचा प्रसार याच शहरातून झाला आहे. आधुनिक भारताच्या जडण-घडणीमध्ये शिक्षणाचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांमध्ये फक्त पाठ्यपुस्तकी शिक्षणाऐवजी चांगले संस्कार रुजविणे गरजेचे आहे, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथे सांगितले.

साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे उद्‌घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी, अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, दादा जे. पी. वासवानी, रत्ना वासवानी आदी उपस्थित होते

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कोविंद म्हणाले, शिक्षक हा विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर मुल्यवर्धित आयुष्य जगण्याची कला शिकवतात. शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षणामुळे तरुणांमध्ये जागरुकता निर्माण होते. साधू वासवानी शाळेतून देश सेवेसाठी चांगले नागरीक घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांनी शुभेच्छापर भाषणात येथे येऊन आनंद झाल्याचे सांगितले.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री जावडेकर म्हणाले, विद्यार्थी आज मैदानात खेळायला जात नाहीत. अभ्यासक्रमाच्या ओझ्याखाली विद्यार्थी राहू नयेत म्हणून लवकरच नवीन शिक्षण पद्धती आणण्यात येईल. याबाबत अनेक सूचना मागविण्यात आल्या असून लवकरच तो अंमलात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
दादा जे. पी. वासवानी यांनी आपल्या भाषणात शाळा स्थापनेचा उद्देश सांगितला. आभार प्राचार्या आरती पाटील यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)