विद्यार्थ्यांनी सादर केली तलवारबाजीची प्रात्यक्षिके

बोपखेल – भोसरी येथील ज्ञानसागर विद्या मंदिरात शिवजयंती उत्सवात साजरा करण्यात आला.

जम्मू काश्‍मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करुन कार्यक्रमास सुरूवात झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी भाषण, पोवाड्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र मांडले. कथाकथनाला उत्स्फूर्त दाद मिळाली.

विद्यार्थ्यांनी तलवारबाजीची नेत्रदीपक प्रात्यक्षिके सादर केली. शिक्षिका संगीता लावंडे, वैशाली जगताप, शुभांगी दांगट यांनी भाषणे केली. संस्थेचे सचिव दतात्रय शिंदे, अध्यक्ष दिपाली शिंदे यांनी संयोजन केले. काळूराम गोडांबे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.