विद्यार्थ्यांनी सादर केले “स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन’

पिंपरी – जेएसपीएम व टीएसएसएम संचलित बावधन येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी शैक्षणिक संकुल येथे आयोजित केलेल्या टेक्‍नोथॉन – 19 या स्पर्धात्मक तांत्रिक महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यात विद्यार्थ्यांनी स्मार्ट ट्रान्सपोर्टेशनवर आधारित वैविध्यपूर्ण प्रकल्प सादर केले.

यावेळी अमरावतीच्या गर्व्हमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे माजी प्राचार्य डॉ. बी. एन. जाजु, जेएसपीएमचे संचालक प्रा. रवि जोशी, डॉ. ए. जी. खरात, ताथवडे संकुलाचे संचालक डॉ. पी. पी. विटकर, नऱ्हे टेक्‍निकल कॅम्पसचे संचालक डॉ. आर. के. लाड, पीव्हीपीआयटी बावधन संकुलाचे संचालक प्रा. शशिकांत थिटे, हडपसर येथील जेएसपीएमचे प्राचार्य डॉ. नितीन करडीकर, प्राचार्य सी. एम. सेदाणी, टेक्‍नोथॉनचे समन्वयक स्थापत्य आभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. रविराज सोरटे आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी डॉ. जाजु म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानामुळे उद्योगक्षेत्र वाढले आहे. आपल्यापुढे असलेल्या आव्हानाला एक संधी म्हणून पहायचे आहे. समस्यांवर शोध लावून तोडगा काढणे म्हणजेच क्रिएटिव्हीटी होय. समाजाला व देशाला उपयुक्त ठरेल असे संशोधन करा, असा सल्ला त्यांनी दिला. तर डॉ. जोशी म्हणाले की, टेक्‍नोथॉन म्हणजेच टेक्‍निकल मॅरेथॉन. तांत्रिक उपक्रमाचा प्रवास सतत सुरू ठेवला पाहिजेत.

या वर्षी स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन ही टेक्‍नोथॉनची मध्यवर्ती संकल्पना होती. या तांत्रिक महोत्सवात राष्ट्रीय स्तरावरील दीडशेहून अधिक महाविद्यालयातून तीन हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. 17 हून अधिक तांत्रिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञाचे कौशल्य पणास लावले. मॉडेल मेकिंग, डी. बी. मॅनिया, लेथ वॉर, रोबो रेस्टलींग, फिल्ममेकिंग व डाउजींग (जलशोध) वर्कशॉप यांचा समावेश होता. यांत्रिकी आभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कमलेश सोरटे, विद्यार्थी प्रतिनिधी निनाद बापट, शुभम सहाणी, विश्‍वराज सिसोदीया, तेजस भोसले, अजिंक्‍य जायभाये यांनी विशेष परिश्रम घेतले. डॉ. रविराज सोरटे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन हर्षदा टिंगरे, यश लोढा, श्रेया मोहन यांनी केले. आभार डॉ. कमलेश सोरटे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)