विद्यार्थ्यांनी लोणावळा रेल्वे स्टेशन केले चकाचक

कार्ला – “स्वच्छ भारत अभियान’ या केंद्र शासनाच्या विशेष उपक्रमांतर्गत बुधवारी (दि. 22) रेल्वे प्रशासनातर्फे आयोजित कार्यक्रमाद्वारे येथील व्ही. पी. एस. हायस्कूलच्या सुभाषचंद्र बोस व राणी लक्ष्मीबाई पथकांतील सुमारे 70 स्काऊट व गाईडनी लोणावळा रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छता केली.

या पथकांतर्फे स्वच्छ भारत जनजागृती रॅली काढून प्रवाशांना विविध घोषणा व बेनर्सद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला. रेल्वे स्थानकावर रॅलीचे आयोजन करण्यात आले. याकरिता रेल्वे विभागाने मोठे सहकार्य केले. या रॅलीचे सर्व नियोजन स्काऊट शिक्षक संजय पालवे यांनी केले. स्काऊटर धुळाजी देवकाते यांनी सहकार्य केले. स्वच्छ भारत अभियान रॅलीसाठी स्टेशन रेल्वे विभागातील स्टेशन प्रबंधक देशपांडे, मुख्य आरोग्य निरीक्षक गणेश साळुंके, रेल्वे पुलिस निरीक्षक सतपाल सिंग मुख्य वाणिज्य निरीक्षक जॉन सुरीन उपस्ति राहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गणेश साळुंके व सतपालसिंग यांनी विद्यार्थांना स्वच्छतेचे महत्त्व सांगून त्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देऊन रॅलीची सांगता करण्यात आली. या अभियानासाठी सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊटर विजयकुमार जोरी, प्राचार्य सुधींद्र देशपांडे, उपप्राचार्या मरिना नेव्हूज, पर्यवेक्षक सुरेखा परदेशी, सुनीता नाईक व संजय रत्नपारखी तसेच भगवान आंबेकर या सर्वांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)