विद्यार्थ्यांनी बनविली हवेवर चालणारी गाडी

सावंत पॉलिटेक्‍निकच्या विद्यार्थ्यांचे संशोधन

वाघोली- जेएसपीएमच्या भिवराबाई सावंत पॉलिटेक्‍निकमधील मेकॅनिकल इंजिनीरिंग विभागातील विद्यार्थ्यांनी प्रदूषण विरहित व इंधन विरहितहवेवर चालणारी गाडी बनवली आहे. अनेकांच्या उपस्थितीत या गाडीचे प्रात्यक्षिक देखील विद्यार्थ्यांनी करून दाखवले आहे. सध्य परिस्थितीत संपुष्टात आलेले पारंपरिक ऊर्जेचे स्रोत व आजची परिस्थिती लक्षात घेता इंधनाची बचत ही काळाची गरज बनली आहे. यावर उपाय म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या हवेवर चालणाऱ्या गाडीचा शोध लावला.

या गाडीमध्ये कॉम्प्रेस केलेली हवा, एअर गनच्या माध्यमातून रिडक्‍शन गिअरला पाठवून तिचे रूपांतर गाडीच्या नियंत्रित गतीमध्ये केले आहे. या प्रकल्पामध्ये अंतिम वर्षामध्ये शिकत असलेल्या कुणाल कोरपे, विजय शेलार, प्रथमेश चव्हाण, समीर वाघमोडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या प्रकल्पासाठी एकूण 55 हजार रुपये इतका खर्च झाला आहे. जेएसपीएम वाघोली संकुलाचे संचालक डॉ. सचिन आदमाने यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. यावेळी विभागप्रमुख डॉ. प्रदीप काळे, प्रकल्प मार्गदर्शक प्रा. पी. व्ही. कसबे, प्रा. एन. ई. भुतेकर, शिक्षक उपस्थित होते.

वाघोली येथील पालक संदीप कटके म्हणाले की, भिवराबाई सावंत पॉलिटेक्‍निकमध्ये विद्यार्थ्यांना अशा विविध उपक्रमामध्ये प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.