विद्यार्थ्यांनी केली पशु-पक्ष्यांच्या अन्न-पाण्याची सोय

रेडा- इंदापूर तालुक्‍यातील शिंदेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात व झाडांवरती पशु-पक्ष्यांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची व खाद्याची सोय व्हावी म्हणून शीतपेयांच्या रिकाम्या प्लॅस्टीकच्या बाटल्यापासून जवळ जवळ 15 कॅनची व्यवस्था शाळेचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी केल्याने या परिसरात अन्न-पाण्याच्या शोधात फिरणारे पशु-पक्षी आता शाळेच्या आवारात जमा होवू लागल्याने पक्ष्यांच्या चिवचिवाटाने परिसर गजबजू लागला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत या परिसरातील पशु-पक्ष्यांना पाण्याची व खाद्याची सोय व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी सुट्टीच्या अगोदर टाकाऊ असलेल्या प्लॅस्टीक बाटल्या जमा केल्या व त्या टिकाऊ वस्तू म्हणून पाण्यासाठी वापर केला. त्या बाटल्या या परिसरातील पंधरा ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. झाडावरती , शाळेच्या व्हरंड्यात, मंदिरात अशा बाटल्या लटकवल्या असून त्यामध्ये पाणी व खाद्य ठेवल्याने शेकडो पशु-पक्षी जमा होवू लागल्याने त्यांच्या अन्न-पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)