विद्यार्थ्यांच्या आर्थिक साक्षरतेसाठी कार्यक्रम

मुंबई  – एलआयसी म्युच्युअल फंडाने परिवर्तन लर्निंग सोल्यूशन्सच्या सहयोगाने माय मनी टेस्ट हा आर्थिक साक्षरता कार्यक्रम जाहीर केला आहे.
माय मनी टेस्ट हा विशेष व नावीन्यपूर्ण कार्यक्रम असून तो विद्यार्थ्यांचे आर्थिक ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करतो. या वर्षी 15 शहरांतील 27000 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याने या कार्यक्रमाला मोठे यश मिळाले आहे.

विद्यार्थ्यांना आर्थिक शिक्षण देण्यासाठी व त्यांच्यामध्ये आर्थिक सवयी रुजवण्यासाठी, हा कार्यक्रम म्हणजे स्वयंशिक्षणाचे व्यासपीठ आहे. आर्थिक संकल्पना व पैशांच्या व्यवस्थापनाचे तंत्र याविषयी जागृती करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.

परिवर्तन लर्निंग सोल्यूशन्सची संकल्पना असलेल्या व एलआयसी एमएफचे पाठबळ असलेल्या माय मनी टेस्टची रचना इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आली आहे व हा कार्यक्रम पूर्णतः मोफत असून त्यासाठी अतिरिक्त नोंदणी शुल्क आकारले जात नाही.

प्रत्येक व्यक्तीला दैनंदिन जीवनामध्ये आर्थिक समावेशकतेची गरज असते. गुंतवणुकीवरील पुस्तके व लेख कोणालाही डाउनलोड करता येऊ शकतात,असे एलआयसी म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राज कुमार यांनी सांगितले.

आजच्या आव्हानात्मक जीवनात पैशांचे व्यवस्थापन हे जीवनावश्‍यक व महत्त्वाचे कौशल्य आहे. आर्थिक बाबतीत साक्षर असलेली व्यक्ती जीवनातील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम होते. या उपक्रमाद्वारे एलआयसी लाइफने तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याचे ठरवले आहे. तरुणांनी जीवनात मोठे बदल करणारे निर्णय घेतल्यानंतर नाही, तर त्याआधीच योग्य आर्थिक निर्णय घेणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)