विद्यार्थी व शिक्षकांनी फुलवली औषधी वनस्पतींची बाग

चिंचवड – क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिर चिंचवड विद्यार्थी आणि शिक्षकांनी औषधी वनस्पतींची बाग फुलवली आहे. पर्यावरण आणि मानवी आरोग्य या दोन्हींच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची अशा औषध वनस्पतींची बाग येथे फुलवण्यात आली आहे.

क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिर चिंचवडयेथील सहशिक्षिका वीणा तांबे यांनी शाळेला बेल, कडीपत्ता, ओवा, आघाडा, पानफुटी, सफेद जास्वंद, कोरफड, गवती चहा, मधुमेहावरील उपयुक्‍त विशेष वनस्पती अशा जवळपास पंधरा प्रकारच्या औषधी वनस्पती भेट दिल्या. उपक्रमाची पूर्वतयारी म्हणून विद्यार्थ्यांनी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्‍यक ती सर्व काळजी घेतली होती. बागेची मशागत करुन शेणखताचा वापर करुन, जुन्या बांबूंपासून सुंदर असे कुंपण तयार करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

क्रांतिवीर चापेकर विद्या मंदिरचे पदाधिकारी संजय कुलकर्णी, माध्यमिक विभागाचे शाला समिती अध्यक्ष अशोक पारखी, प्राथमिक विभागाचे शाला समिती अध्यक्ष गतिराम भोईर या मान्यवरांच्या हस्ते औषधी वनस्पतींचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण व आरोग्य संवर्धन करणाऱ्या या नवोपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती तिकोने यांनी वीणा तांबे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन
या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्यासाठी निसर्गाने आपल्याला बहाल केलेल्या औषधी वनस्पतींविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. फलक लेखन करुन त्यावर चर्चा घेवून शिक्षकांनी विदयार्थ्यांना अपरिचित असलेल्या वनस्पतींचा उपयोग समजावून दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून विदयार्थ्यापुढे एका विधायक कामाची जाणीव निर्माण झाली. वनस्पती संगोपनाची जबाबदारी विदयार्थ्यांनी स्वखुशीने स्विकारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)