विद्यार्थीनीच्या मृत्यूप्रकरणी टेम्पो चालकाला एक वर्ष कारावास

सातारा- खंडाळा तालुक्‍यातील खेड बुद्रुक गावच्या हद्दीत खंडाळा ते लोणंद रोडवर भरधाव वेगात असलेल्या वाहनाने जोरदार धडक देत एका 14 वर्षीय शालेय विद्यार्थिनींच्या मृत्यूस व दोन शालेय विद्यार्थिनींच्या गंभीर दुखापतीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पोचालकाला खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्ष सश्रम कारावास व एकत्रित चार हजार रुपये दंड व दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. राजेंद्र शामराव गाढवे (वय 38, रा. शिवाजी चौक, खंडाळा ता. खंडाळा) असे शिक्षा सुनावलेल्या टेम्पोचालकाचे नाव आहे.

खेड बुद्रुक गावच्या हद्दीत 22 जानेवारी 2014 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास शाळेमध्ये निघालेल्या अमृता भगवान धायगुडे, सुजाता अधिक धायगुडे व पद्मा शंकर धायगुडे या शालेय विद्यार्थिनी निघाल्या होत्या. यावेळी खंडाळा ते लोणंद जाणाऱ्या रोडवर भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने पाठीमागून या तिघींना जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये अमृता भगवान धायगुडे (वय 14) ही विद्यार्थिनी गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाली तर सुजाता धायगुडे व पद्मा धायगुडे या किरकोळ जखमी झाल्या. दरम्यान, विद्यार्थिनींच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पोचालक राजेंद्र शामराव गाढवे याच्याविरुद्ध वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करणे, अविचाराने, हयगयीने, निष्काळजीपणे, बेदरकारपणे वाहन चालवून मृत्यूस व दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी लोणंद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानुसार लोणंद पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व तपासी अधिकारी भरत किंद्रे यांनी टेम्पोचालक राजेंद्र शामराव गाढवे याच्याविरुद्ध खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार सुनावणी होत खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई यांनी केलेला युक्तिवाद व दाखल केलेले पुरावे, प्रयत्यक्षदर्शी, साक्ष ग्राह्य धरत खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अजित बी. चव्हाण यांनी टेम्पोचालक राजेंद्र गाढवे याला अमृता धायगुडे या शालेय विद्यार्थिनीच्या मृत्यूस व दोन विद्यार्थिनीच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दोषी धरत एक वर्ष सश्रम कारावास व एकत्रित चार हजार रुपये दंड व दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)