विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर

तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे आणि परिसरातील शाळा, महाविद्यालयात मुलींच्या सुरक्षिततेबाबतचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाढत्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, जागरूक नागरीक आणि सरसेनापती उमाबाई दाभाडे ब्रिगेडतर्फे पुन्हा एकदा सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन श्रीमंत सरसेनापती उमाबाई दाभाडे महिला व बालकल्याण संस्थेच्या उपाध्यक्ष याज्ञसेनीराजे दाभाडे यांनी केले.

संस्थेतर्फे येथील नगरपालिकेच्या सरसेनापती उमाबाई दाभाडे कन्याशाळेत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तळेगाव दाभाडे परिसरात मुलींना होणाऱ्या त्रासाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून टवाळखोर मुलांची संख्याही वाढत चालली आहे. कॉलेज व शाळा परिसरात मुलींची अडवणूक करून त्यांना त्रास देण्याचे सत्र सुरूच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या वेळी ब्रिगेडच्या दशकपूर्तीचा आढावा घेण्यात आला. वंदना केमसे यांनी मुलींना मार्गदर्शन केले. निडर होऊन आत्मविश्‍वासाने मुकाबला करण्यासाठी मुलींना सर्वोतोपरी मदत, मार्गदर्शन करण्याचे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले. याज्ञसेनीराजे दाभाडे यांनी याकामी सुरू केलेल्या स्वसंरक्षण उपक्रमाबाबत मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेतील मुलींसाठी कराटे प्रशिक्षक वैष्णवी आणि प्रशिक्षक प्रज्ज्वल दाभाडे यांनी प्रात्यक्षिके सादर केली.

या वेळी संस्था अध्यक्ष श्रीमंत उमाराजे दाभाडे (सरकार), ब्रिगेडच्या कार्यसमिती प्रमुख वंदना केमसे, उपप्रमुख शबनम खान, उर्मिला छाजेड, रुपाली दाभाडे, सुरेखा जगताप, लीना कवितके, सोनाली दाभाडे, संपर्क बालग्रामचे अधिकारी प्रदीप वाडेकर, यशवंत दाभाडे, मधुरा दाभाडे, मुख्याध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)