विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर डॉ. संजीव सोनवणे बिनविरोध

 

पुणे, दि. 31 – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या समाविष्ट असलेल्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज बिनविरोध झाली. “एज्युकेशन’ अभ्यास मंडळावर विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजीव सोनवणे, “ऍडमिनिस्ट्रेशन ऍण्ड इव्हॅल्युशन’ अभ्यास मंडळावर डॉ. मेघा उपलाने आणि “एज्युकेशन सायकॉलॉजी’ अभ्यास मंडळावर डॉ. चंद्रकांत बोरसे यांची अध्यक्षपदावर निवड झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक दि. 10 ऑगस्ट रोज होणार होती. मात्र या निवडणुकीसाठी प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी विद्यापीठात झाली. उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर या तीन अभ्यास मंडळासाठी प्रत्येकी एकच अर्ज वैध ठरले आहे. त्यामुळे ह्या निवडणुका बिनविरोध झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्याबाबतची अधिकृत घोषणा दि. 10 ऑगस्ट रोजी होणार आहे. डॉ. उपलाने ह्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागाच्या, डॉ. बोरसे हे नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक समाजाचे कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य आहेत.

दरम्यान, विद्यापीठाच्या एकूण 62 अभ्यास मंडळे असून, त्यापैकी तीन अभ्यास मंडळाच्या निवडणुका पूर्ण होत आहे. याच दरम्यान वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत समाविष्ट असलेल्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. ह्या निवडणुका दि. 21 ऑगस्ट रोजी होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम विद्यापीठाच्या निवडणूक विभागाने आज संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)