विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ येत्या शुक्रवारी

7 हजार242 स्नातकांना पदव्या, 11 जणांना सुवर्णपदके
-विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे प्रमुख पाहुणे
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 113 वा पदवी प्रदान समारंभ शुक्रवार, दि. 1 जून रोजी संध्याकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर एम. मुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमात एकूण 11 जणांना सुवर्णपदके प्रदान केली जाणार आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार वर्षातून दोनदा पदवी प्रदान कार्यक्रम आयोजित केले जातात. वर्ष 2016-17 मध्ये आणि त्याआधी उत्तीर्ण पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील एकूण 7,242 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. यामध्ये पीएचडी पदवी 104, एम.फिल 54, पदव्युत्तर पदवी 3006, पदव्युत्तर पदविका 63, पदवी 3994 आणि पदविका प्राप्त 21 जणांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
दरम्यान, सायंकाळच्या मुख्य कार्यक्रमापूर्वी सकाळी 11 ते दुपारी 4 या काळात स्नातकांना पदव्या दिल्या जातील. या पदव्या प्रशासन भवनाजवळील नव्याने बांधण्यात आलेल्या परीक्षा भवना दिल्या जातील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अशोक चव्हाण यांनी दिली.

या अकरा विद्यार्थ्यांना मिळणार सुवर्णपदक
देवयानी पाटील, आकाश हजारी, उदय सुतार, गंभीर विद्याधर, अनुश्री कोगजे, भूषण गरवारे, प्रज्ञा दीक्षित, सायली काळे, सुधीर माळी, तायरोन मिरंडा, झोहराझबीन शेख या अकरा विद्यार्थ्यांना विविध संस्था व सन्मानार्थींच्या नावे गोल्ड मेडल दिले जाणार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)