विठ्ठलवाडी 1600 किलो निर्माल्य संकलन

तळेगाव ढमढेरे-शिरूर तालुका कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण जगताप व प्राध्यापक संदीप गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली मेन चौक प्रतिष्ठानच्या युवकांनी व श्री पांडुरंग विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी भीमा नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत गणेशोत्सव विसर्जनप्रसंगी निर्माल्य गोळा केले.
शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे व विठ्ठलवाडी पंचक्रोशीतील वाड्या-वस्त्यांवरील लहान-मोठी गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणपती असे एकूण 900च्या दरम्यान गणपतींचे भीमा नदीमध्ये पाण्यात विसर्जन करण्यात आले. यावेळी 1600 किलो निर्माल्य संकलन करण्यात आले. निर्माल्य संकलनाचा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून विठ्ठलवाडी येथील भीमा नदी काठावर राबवला जात आहे. यावेळी विविध गणेश मंडळे व गणेश भक्तांनी उत्स्फूर्तपणे आपले निर्माल्य कार्यकर्त्यांकडे दिले. जमा झालेल्या निर्माल्यापासून ग्रामपंचायतीच्या संत निळोबाराय उद्यानामध्ये कंपोस्ट खत तयार केले जाणार असून, हे खत उद्यानातील झाडांना वापरण्यात येणार आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दिनेश राऊत, उपसरपंच बाबाजी गवारी, माजी उपसरपंच दिलीप गवारे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर राऊत, पोलीस पाटील शरद लोखंडे, दिलीप शेलार आदी मान्यवर उपस्थित होते. विठ्ठलवाडी तालुका शिरूर येथे मेन चौक प्रतिष्ठान व श्री पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या चार वर्षापासून भीमा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गणेश विसर्जनप्रसंगी निर्माल्य संकलन हा उपक्रम राबविला जात आहे. यासाठी मंडळाच्या घनश्‍याम गवारी, ऍडव्होकेट संतोष गवारी, शामराव गवारी, महादेव पवार, सुधीर कातोरे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)