विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रम

चिंचवड – पिंपरी-चिंचवड महापालिका सायन्स पार्कच्या वतीने विज्ञान दिनानिमित्त येत्या 28 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये हे कार्यक्रम होतील. यामध्ये सकाळी दहा ते अकरा या वेळेत विज्ञान फिल्म शो, साडेअकरा ते साडेबारा दरम्यान ए. के. जैन यांचे ऊर्जा संवर्धन याविषयावर व्याख्यान, साडेबारा ते दीड दरम्यान प्रश्‍नमंजुषा स्पर्धा, यानंतर एन. टी. कासार विज्ञान प्रयोग व प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.

डॉ. ललितकुमार शर्मा यांचे विज्ञान व पर्यटन याविषयावर व्याख्यान होईल. पारितोषिक वितरणाने कार्यक्रमाचा समारोप होईल, अशी माहिती सायन्स पार्कच्या वतीने देण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.