विजेचा दाब वाढल्याने उपकरणे जळून खाक

फलटण – फलटण शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने जनता त्रस्त असताना मंगळवार, 22 रोजी शहरातील लक्ष्मीनगर, विद्यानगर भागात विजेचा पुरवठा कमी जादा झाल्याने अनेकांची इलेक्‍ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाली आहे. या घटनेत नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून वीज वितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

फलटण शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार विज खंडित होत आहे. यामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत. त्यातच आता वीज पुरवठा कमी जास्त दाबाने होण्याचे प्रकार वाढले आहे. मंगळवार 22 रोजी वारंवार वीज खंडीत होत होती. अचानक वीजेचा दाब वाढल्याने लक्ष्मीनगर, विद्यानगर भागातील अनेकांचे इलेक्‍ट्रॉनिक जळून खाक झाले. यामध्ये टीव्ही, मोटारी आदी साहित्याचे नुकसान झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबाबत शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात चौकशी केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी असा प्रकार कोठे घडला नसल्याचे स्पष्ट केले तर दुसरीकडे अनेक नागरिकांनी उपकरणाचे निदर्शनास आणून दिले. वीज वितरण कंपनीने पुरेशा दाबाने वीज पुरवठा चालू ठेवावा व वारंवार वीज जाण्याचे प्रकार सुरू आहेत ते थांबवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

शहरातीव वीजपुरवठा वारंवार खंडीत होणे तसेच कमी जास्त प्रमाणात वीजपुरवठा होण्याचा प्रकार गेल्या एक-दोन दिवसांपासून सुरु आहे. मंगळवारी अचानक दाब वाढल्याने घरातील विद्युत उपकरणाचे नुकसान झाले आहे. याबाबत महावितरणने योग्य ती दक्षता घेणे गरजेचे असून नागरिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी.

– सचिन सुर्यवंशी-बेडके
नगरसेवक, फलटण न.पा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)