विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा: हिमाचल प्रदेशला नमवून महाराष्ट्राचा पाचवा विजय

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा29

बंगळुरू- ऋतुराज गायकवाडचे शानदार शतक आणि रोहित मोटवानीच्या साथीत त्याने केलेल्या शतकी भागीदारीनंतर गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशचा 83 धावांनी धुव्वा उडविताना विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचव्या विजयाची नोंद केली. महाराष्ट्राने याआधी पंजाब, कर्नाटक, रेल्वे आणि बडोदा या संघांवर मात केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारणाऱ्या महाराष्ट्राचा डाव 49.5 षटकांत सर्वबाद 278 धावांवर संपुष्टात आला. परंतु महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी हिमाचल प्रदेशचा डाव 44.2 षटकांत सर्वबाद 195 धावांवर गुंडाळताना आपल्या संघाला आणखी एक विजय मिळवून दिला. हिमाचल प्रदेशकडून निखिल गंगताने 76 धावांची खेळी करताना अंकुस बैन्सच्या साथीत 123 धावांची भागीदारी करून कडवी झुंज दिली. परंतु हिमाचल प्रदेशचे बाकी फलंदाज अपयशी ठरल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला.

महाराष्ट्राकडून समद फल्लाहने 18 धावांत 3 बळी घेतले. शमशुझामा काझी व आशय पालसकर यांनी 2-2 बळी घेत त्याला साथ दिली. त्याआधी ऋतुराजने 115 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकारासह 114 धावांची खेळी करताना रोहितच्या साथीत 113 धावांची व नौशाद शेखच्या (38) साथीत 66 धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राचा डाव सावरला. रोहितने 64 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 53 धावा केल्या. काझीने 17 चेंडूंत 24 धावा फटकावताना महाराष्ट्राला 278 धावांची मजल मारून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)