#IPL2019 : विजयी लय कायम राखण्याचे बंगळुरूसमोर आव्हान

मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
वेळ – रा. 8.00 व
स्थळ – वानखेडे मैदान, मुंबई

मुंबई – आपल्या सातव्या सामन्यात पहिला विजय मिळवणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर आज मुंबई इंडियन्सचे आव्हान असून आजचा सामना जिंकून प्ले ऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यास मुंबईचा संघ उत्सूक असणार असून स्पर्धेतील आपला दुसरा विजय मिळवण्यास बंगळुरूचा संघ प्रयत्नशील असणार आहे.

स्पर्धेतील आपले पहिले सहा सामने गमावल्यानंतर बंगळुरूच्या संघाने मोहाली येथील सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव करत आपला पहिला विजय नोंदवला. यावेळी या विजयाने बंगळुरूच्या क्रमवारीत विशेष फरक पडला नसून त्यांचे सात सामन्यांमध्ये एक विजय आणि सहा पराभवांसह केवळ दोन गुण झाले आहेत. त्यामुळे ते क्रमवारीत अखेरच्या स्थानी आहेत.

तर, दुसरीकडे, मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या अखेरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव पत्करला असून लागोपाठ तीन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर त्यांन पराभवाची चव चाखावी लागली आहे. त्यामुळे त्यांचे सात सामन्यात चार विजय आणि तीन पराभवांसह आठ गुण झाले असून ते सध्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी विराजमान आहेत. त्यामुळे आजचा सामना जिंकून प्ले ऑफ मधील प्रवेशाच्या दृष्टीने ते प्रयत्नशील असणार आहेत.

मुंबई इंडियन्सने यंदाच्या मोसमात संमिश्र कामगिरीकेली असून राजस्थान विरुद्धच्या सामन्यात चांगल्या सुरूवातीनंतरही मधल्या फळीने केलेल्या खराब कामगिरीने मुंबईच्या संघाला मोठी धावसंख्या गाठण्यात अपयश आले होते. तर, रोहित शर्मा आणि सुर्यकुमर यादवयांना चांगल्या सुरूवातीचे रुपांतर मोठ्या खेळीत करण्यात अपयश आले होते. त्यातच बालाढ्य समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या गोलंदाजांची राजस्थानच्या सलामीवीरांनी चौफेर फटकेबाजी करत हवा काढून टाकली. त्यातल्या त्यात हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात सहा गडी बाद करणाऱ्या अल्झारी जोसेफने तर आपल्या तीन षटकांमध्ये तब्बल 53 धावा दिल्या. त्यामुळे आजच्या सामन्यात त्याच्या जागी मिचेल मॅकलघनचा समावेश केला जाण्याची शक्‍यता आधीक आहे.

तर, दुसरीकडे, बंगळुरूच्या संघाने पहिल्या सहा सामन्यात पराभव पत्करल्यानंतर पंजाब विरुद्धच्या सामन्यात सुरेख अष्टपैलू कामगिरीच्या बळावर विजय मिळवला होता. मात्र, त्यांच्या गोलंदाजांना पुन्हा एकदा धावा रोखण्यात अपयश आले त्यामुळे पंजाबच्या फलंदाजांनी सामन्यावर वर्चस्व निर्माण केले होते. मात्र, बंगळुरूच्या फलंदाजांनी आश्‍वासक कामगिरीकरत संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे जर त्यांना मुंबई विरुद्ध विजय मिळवायचा असेल तर आजच्या सामन्यात बंगळुच्या संघातील गोलंदाजांना चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, क्विंटन डी-कॉक, एविन लुईस, कायरॉन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्‍लेनघन, ऍडम मिल्ने, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन, युवराज सिंग, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, पंकज जासवाल, रसिक सलाम, अल्झारी जोसेफ.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (कर्णधार), मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, कुलवंत खेजरोलिया, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, ए.बी. डिव्हीलियर्स, कॉलिन डी-ग्रॅंडहोम, मोईन अली, डेल स्टेन, टीम साऊदी, शिवम दुबे, शिमरॉन हेटमायर, अक्षदीप सिंह, देवदत्त पडीकल, हेन्‍रीच क्‍लासिन, गुरकीरत सिंह, हिम्मत सिंह, प्रयास राय बर्मन.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.