विक्रमशील कदम यांच्या वाढदिनी पुसेसावळीत विविध कार्यक्रम

पुसेसावळी, दि. 26 (वार्ताहर) – येथील वर्धन ऍग्रो प्रोसेसिंग लि. चे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 27 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी औक्षण झाल्यानंतर विक्रमशील कदम पुसेसावळी, गोरेगाव वांगी येथे ग्रामदैवतांचे दर्शन घेतील. सकाळी दहा वाजता प्राथमिक शाळा व डी. पी. कदम इंग्लिश स्कुल येथे वही वाटप, 11 वाजता ध्येयसिध्दी ऍकॅडमीचे उद्‌घाटन होणार आहे. दुपारी 12 ते 3 यावेळेत कारखाना कार्यस्थळावर शुभेच्छा स्वीकार करणार असून सायंकाळी 7 वाजता दत्त चौक पुसेसावळी येथे वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन धैर्यशील दादा युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)