विकास कामांसाठी उपोषण

देहुरोड – देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील वार्ड क्रमांक चारमध्ये विकास कामासांठी दुजाभाव केल्याच्या आरोप करत व विविध विकास कामांची मागणी करत आंदोलकांचे उपाषेण सलग दुसऱ्या दिवशी ही सुरु राहिले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील वार्ड क्रमांक तीन व आरक्षित वार्ड चार हा कॉंग्रेसचा गड मानला जातो. गत पंचवार्षिक व यंदाच्या निवडणुकीत येथील जनतेने कॉंग्रेसच्या उमेदवारांनाच कौल दिला. बोर्डात भाजपची सत्ता असल्याने वार्ड क्रमांक चारच्या विकास कामांकडे जाणुन-बुझून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचाच्या वतीने धर्मपाल तंतरपाळे यांच्या नेतृत्वात शंकर मंदिराजवळ उपोषण सुरू करण्यात आले आहे. विजय मोरे, पंकज तंतरपाळे, देवराम ढोके, रवि चावरे, व्यंकटेश कोळी, दिपक सायसर, लक्ष्मण ढिल्लौड, माणिक गडलिंकर, जलाल शेख, मेघराज तंतरपाळे, ऍड गुलाबराव चोपड़े, शिवराम आहिरे, मिलिंद कसबे, विजय पवार, आनंद ढिल्लौड, विजय थोरी, रेणु रेड्डी, लक्ष्मण कांबळे , रमेश पवार, उत्तमराव हिंगे आदी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

या आहेत मागण्या
शितळानगर नं.2, राजीव गांधी नगर, शिवाजीनगर, श्रीकृष्णनगर, पारशी चाळ येथे बंदिस्त ड्रेनेज लाइन बांधण्यात यावी, नादुरूस्त शौचालये दुरुस्त करण्यात यावीत, महिलांसाठी नवीन शौचालय बांधावे, पीसीसी रस्ता करावा, महर्षी वाल्मिकी मंदिराचा जीर्णोद्धार करावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बांधावे, संकल्पनगरी जवळील उद्यानास नागरिकांच्या शिफारशीनुसार नाव द्यावे, हे उद्यान लहान मुलांच्या खेळण्या व्यतिरिक्‍त कोणत्याही कारणासाठी इतरांना भाडयाने देवू नये, सर्वत्र एलईंडी दिवे बसवावे, कुंचीकर समाजाच्या वस्तीत रस्ता उपलब्ध करावा, वार्ड क्रमांक चार मध्ये इतर वार्डाच्या नगरसेवकांचा हस्तक्षेप थांबवावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

महावितरण अधिकाऱ्यांचे आश्‍वासन
महावितरणाच्या कामांबाबत असणाऱ्या समस्या, त्रुटी व मागण्यांबाबत बाबत देहुरोड महावितरणाच्या शाखा अभियंत्यास भेटून चर्चा करण्यात आली असून कामे करण्याचे आश्वासन उपविभागीय कार्यकारी अभियंता राजेश गुजर, सहाय्यक अभियंता संतोष झोडगे यांनी उपोषणकर्त्याना भेटून दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)