विकलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची वसुली होण्यासाठी अचूक मीटर रिडींग घ्या : ओमप्रकाश बकोरीया

नांदेड : महावितरणच्या आर्थिक स्थैर्यासाठी विकलेल्या प्रत्येक युनिटच्या रक्कमेची वसुली होणे अत्यावश्‍यक आहे. त्याकरिता अचुक मीटर रिडींग घेणे गरजेचे आहे असे विचार महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरीया यांनी व्यक्त केले. काल नांदेड परिमंडळाच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीस प्रादेशिक कार्यालयाचे सहाय्यक महाव्यवस्थापक लक्ष्मीकांत राजेल्ली, अधीक्षक अभियंता उदयपाल गाणार तसेच, नांदेड परिमंडळाचे प्रभारी मुख्य अभियंता आजीनाथ सोनवणे प्रामुख्याने उपस्थित असलेल्या या आढावा बैठकीत ते बोलत होते, बकोरिया पुढे म्हणाले की, वीज गळती कमी करण्याचे उध्दिष्ट समोर ठेवून विजेची विक्री वाढवली पाहिजे. आपण विकलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटचे मोजमाप होणं गरजेचे आहे. त्यासाठी अचुक व योग्य मीटर रिडींग झालेच पाहिजे.

मीटर रिडींग एजन्सी याकामी दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरीत एजन्सी बंद करण्याची कारवाई करत प्रसंगी महावितरणच्या कर्मचा-यांना मीटर रिडींग घेण्याचे काम सोपवण्यात यावे. त्याच बरोबर घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांना जाणारे फॉल्टी रिडींग कायमस्वरुपी बंद करुन त्यांनी वापरलेले योग्य रिडींगच त्यांना जाणे आवश्‍यक आहे. ज्या वीजग्राहकांची मीटर नादुरुस्त असतील त्यांचे मीटर त्वरीत बदलून देण्यात यावे. वीना वापर असलेले वीजग्राहक दारो-दारी जावून तपासून पहावेत असे निर्देशही बाकेरीया यांनी दिले. प्रत्येक उपविभागाने नेमूण दिलेले उध्दिष्ट पूर्ण करण्याच्या दिशेनेच कार्यरत रहावे. वसुलीमध्ये बेजबाबदारपणा दिसल्यास संबंधीत अधिका-यावर कडक कारवाई करणार असल्याचे सांगत वीजविक्री व वसुलीत मागे राहणा-या उपविभागाची व्हिडीओ कॉन्फरसिंगव्दारे अथवा प्रत्यक्ष भेट देवून आढावा घेणार असल्याचेही निर्देश त्यांनी दिले. नांदेड परिमंडळाचा भेटी दरम्यान, परभणी, वसमत आणि भोकर विभागामध्ये सुरु असलेल्या एकात्मिक ऊर्जाविकास योजने अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या उपकेंद्राच्या कामाचीही पाहणी श्री बकोरिया यांनी केली. या प्रसंगी विहित मानांकनानुसार योग्यदर्जाची कामे करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)