वाहनांसाठी मोजावे लागणार अधिक पैसे

कारबरोबरच बाईकही ग्राहकांना पडणार महागात 
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने कारसाठी तीन वर्षाचा थर्ड पार्टी विमा काढणे बंधनकारक केले आहे. त्याचबरोबर दुचाकीसाठी पाच वर्षाचा थर्ड पार्टी विमा काढणे बंधनकारक केले आहे. त्याशिवाय 1 सप्टेंबरपासून वाहन विक्री करता येणार नाही. यानंतर या निर्णयाची माहिती आयआरडीए या विमा नियंत्रकानी विमा कंपन्यांना दिली आहे. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून कार आणि दुचाकीचे दर त्या प्रमाणात वाढणार आहेत.
हा विमा वाहन खरेदी करताना आणि त्याची नोंदणी करतानाच घ्यावा लागणार आहे. यामुळे ग्राहकाना अधिक रक्कम देऊन वाहन खरेदी करावे लागणार आहे. वाहन धारक थर्ड पार्टी विमा काढण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे अपघात झाल्यानंतर त्यांना फारशी रक्कम मिळत नसल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर आयआरडीएने त्याची दखल घेऊन या निर्णयाची माहिती सर्व विमा कंपन्यांना दिली आहे. त्याचबरोबर या निर्णयाची अंमलबजावणी 1 सप्टेंबरपासून करायला सांगितले आहे. त्यामुळे सर्व दुचाकी आणि कारच्या किमती 1 सप्टेंबरपासून वाढणार असल्याचे दिसून येते.
आयआरडीएने सांगितले की, चारचाकी वाहनासाठी तीन वर्षांचा तर दुचाकीसाठी पाच वर्षांचा प्रिमीयम वाहन खरेदी करतानाच ग्राहकांना द्यावा लागणार आहे. त्यामुळे चारचाकी वाहनासाठी त्या वाहनाच्या क्षमतेनुसार 5286 ते 24305 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
या संबंधातील प्रकरणाच्या सुनावणीवेळी केंद्र सरकारने न्यायालयाकडे अपघाताची आकडेवारी दिली. त्याचबरोबर अपघात झालेल्याना किती विमा मिळाल्याची माहिती दिली. या माहीतीनंतर न्यायायाने सुरुवातीलाच विम्याचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. देशात मोठ्या प्रमाणात दरवर्षी वाहने रस्त्यावर येत आहेत. त्यांनी वाहने जबाबदारीने चालवावीत तसेच अपघात झाल्यानंतर त्यांना चांगली रक्कम मिळावी, हा या मागे उद्देश असल्याचे न्यायालयाने सांगितले.
त्यानंतर न्यायालयाने आयआरडीएला निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सांगितले. विमा कंपनी किंवा पॉलीसीधारक विमा रद्द करू शकणार नाहीत. या घडामोडीनंतर बऱ्याच वाहन कंपन्यांनी ग्राहकांना शुक्रवारी खरेदी करण्याचा सल्ला दिला असल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर विक्री कमी झाल्यास वाहन कंपन्या मोफत विमा देण्याचे प्रकार करत होत्या. आता त्याचे प्रमाण कमी होण्याची शक्‍यता आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)