वाहनांची कागदपत्रे न तपासण्याचे पोलीसांना आदेश

 वाहतुक कोंडीवर एसपींचा उतारा; विनाकारण त्रास देणाऱ्यांची तक्रार करणाऱ्याचे आवाहन

सातारा,दि.30(प्रतिनिधी)

शहरात सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे वाहतुक कोंडीने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच ठिकठिकाणी उभे असलेले वाहतुक पोलीसांचे चौकीदार नागरिकांना उगाच कागदपत्र तपासणीच्या नावाखाली छळत असल्याच्या अनेक तक्रारींची दखल जिल्हा पोलीस प्रमुखांनी घेतली. त्यांनी जिल्ह्यातील वाहतुक पोलीसांना वरिष्ठांच्या आदेशाशिवाय कोणत्याही वाहनधारकाला कागदपत्र तपासणीच्या नावाखाली विनाकरण त्रास न देण्याचे आदेश दिले आहेत.

वाहन तपासणीच्या नावाखाली वाहतूक कर्मचारी यापूर्वी वाहनधारकांचा मानसिक व आर्थिक छळ करीत होते. त्यामुळे अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवल्याने त्याच्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत गेल्या होत्या. कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली वाहतुक पोलीस किरकोळ कारणावरून पावतीचा आग्रह दरत होते.

त्यामुळे पोलिस कर्मचारी व वाहन धारकांमध्ये यापूर्वी मोठे वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. याच वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याचे जिल्ह्याने पाहिले आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन सातारा जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांना यापुढे वाहने आडवून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी वरिष्ठांच्या परवानगीशिवाय करता येणार नसल्याचे आदेश काढले आहेत.

वाहतूक पोलिसांचे काम केवळ वाहतूक सुरळीत करणे आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील एकाही वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला स्थानिक पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेतल्याशिवाय व नाकाबंदी अथवा वाहन तपासणीचे वरिष्ठांचे आदेश असल्याशिवाय वाहनांच्या कागदपत्राची तपासणी करता येणार नाही. जर कुठल्या कर्मचाऱ्याने यापुढे कागदपत्रे तपासणीचा आदेश असल्याशिवाय कागदपत्राची मागणी केल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.

—————————————————————————————————

घाटातल्या व टोलनाक्‍यावरील पावतीखोरांकडे पण बघा

पुणे बेंगलोर महामार्गावरून पुण्याकडून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांना खंबाटकीच्या घाटात हातात पावती पुस्तके घेऊन उभारलेल्या भुईंज पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या वसुलीला वाहनधारक अक्षरक्ष: वैतागले आहेत. तसेच आनेवाडी टोलनाक्‍यावर तर भुईंज पोलीसांचे व जिल्हा वाहतुकच्या पोलीसमामांचा वाहनधारकांना आडवण्यासाठीची धावपळ पाहिली की नाक्‍यावर मॅरेथॉन सुरू असल्याचा भास वाहनधारकांना होतो. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी खंबाटकी घाट व आनेवाडी टोलनाक्‍यावरील वसुलीलाही चाप लावण्याची मागणी होत आहे.

 

Ads

1 COMMENT

  1. प्रत्येक वर्षी 12 iti डिग्री घेहून
    न महाराष्ट्रयात किमान 50 लाख नावजवन नोकरीचा शोदात असतात पण या 5 वर्षात नोकरी म्हणजे एक खेळ झाला आहे जगली नोकरी मिळत नाही कॉल सेन्टर ची नोकरी मिळते पण 5 वर्षांनी पुन्हा बेकारी तयार होते आशा पडतीने जर देश महाराष्ट्र चला तर आत्महताय कार्बयशिवर पयाय राहणार नाही आज शिकीम सारखे राज्या प्रत्येक घरात एक गावरमेन्ट नोकरीला आहे का करतील तीलते लोक आत्महत्या या साठी महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here