वाहतूक पोलिसावर लाच लूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

वाहतूक पोलिसावर लाच लूचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
नो एंट्रीतून आलेल्या वाहनचालकाकडून सातशे रुपये घेऊन पावती दिली नाही
पुणे,दि.25(प्रतिनिधी)- संभाजी पुलावरुन नो एंट्रीतून आलेल्या वाहनचालकाकडून सातशे रुपये स्विकारुन पावती न देणाऱ्या वाहतूक पोलिसावर लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. संबंधित वाहनचालकाकडून 1200 रुपये दंड स्विकारण्यात आला होता. मात्र पाचशे रुपये परत करण्यात आले व पावती मिळणार नाही असे सांगून त्याला पिटाळले.
रमेश रामकिशन शिरसाट(32, नेमणूक- विश्रामबाग वाहतूक शाखा) असे लाचखोर पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. यासंदर्भात एका 27 वर्षाच्या तरुणाने तक्रार दिली होती.
हा तरुण दुपारच्या सुमारास डेक्कन येथील संभाजी पुलावरुन(लकडी पुल) टिळक रोड येथे दुचाकीवरुन चालला होता. यावेळी त्याची गाडी शिरसाट यांनी अडवली. गाडी नो एंट्रीतून आल्यामुळे तसेच परवाना नसल्याने दंड म्हणून 1200 रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र फिर्यादीने पैसे नसल्याचे सांगितल्यावर गाडी तेथेच ठेऊन घेण्यात आली. त्याने अर्ध्या तासात पैसे घेऊन येते असे सांगून थेट लाच लूचपत प्रतिबंधक कार्यालय गाठले. तेथे तक्रार केल्यावर लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने 1200 रुपयांना पावडर लावून फिर्यादीकडे दिली. यानंतर संभाजी चौकीपाशी सापळा रचण्यात आला. फिर्यादीने 1200 रुपये दिल्यावर त्याला 500 रुपये परत करण्यात आले. फिर्यादीने पावती मागताच त्याला पावती पिवती काय मिळणार नाही येथून पळ असा दम देण्यात आला. यानंतर तातडीने लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने शिरसाट याला ताब्यात घेतले. त्याच्यावर रात्री उशीरा विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक जगदीश सातव यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)