“वाहतुकीचे नियम पाळा, जीवाचा धोका टाळा’

  • सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे यांचे आवाहन

लोणावळा – वाहन चालवताना रस्ता सुरक्षा नियम काटेकोरपणे पाळा आणि जीवाला होणारा संभाव्य धोका टाळा. तुम्हाला वाहन चालवता येते आणि तुमचे वय वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी कमी पडतंय, तर वाहन चालवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. अन्यथा त्याचा त्रास तुमच्या सोबत तुमच्या पालकांनाही भोगावा लागेल, अशी सूचना लोणावळा शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांनी विद्यार्थ्यांना दिली.

रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत सुरक्षा पंधरवड्यानिमित्त लोणावळा शहर पोलीस स्टेशन वाहतूक शाखेने गुरुकुल विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुरक्षा नियम मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. अरविंद काटे यांनी शिबिरात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी गुरुकुल विद्यालयाचे पर्यवेक्षक आसाराम आटोळे, कुमार गरड, बयाजी खुरंगे, निर्मला जाधव, पोलीस हवालदार सुरेश माने, अनंत रावण, वाव्हळे, पोलीस शिपाई होले व अध्यापक वर्ग उपस्थित होता.

वाहतूक शाखेने विद्यार्थ्यांना सुरक्षा नियमांची माहिती पत्रके वाटली. वाहतूक नियमांचे महत्त्व व पोलीस अधिकाऱ्यांसाठी स्पर्धा परिक्षा कशा महत्त्वाच्या आहे, हे देखील काटे यांनी यावेळी मार्गदर्शनात विशद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)