वाळू माफियांकडून बंधारे लिकेज?

निमसाखर- निमसाखर, निरवांगी व खोरोची (ता. इंदापूर) सह अन्य गांवात नीरा नदीपात्र डिसेंबर महिन्यापासूनच कोरडे पडल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांवर पाणीपाणी करण्याची वेळ आली आहे, तर या नदीपात्रात वाळूमाफियांनी धूमाकूळ घातला आहे. तर वाळू उपशासाठी या माफियांकडून जाणूनबूजून बंधारे लिकेज करण्याचा कुटील कारस्थान केल्याची दबक्‍या आवाजात चर्चा सुरू आहे.
खोरोची , बोराटवाडी या ठिकाणी सालाबादप्रमाणे यंदाही अवैध वाळू उपसा होत आहे व आत्ताही तो सुरू आहे. त्या इतर गावांबरोबर निमसाखर परिसरात गेली काहि महिन्यांपासून रितसर वाळू उपसा होतो, त्याप्रमाणे बिनधास्त वाळू उपसा सुरू आहे. हा उपसा निमसाखर भागातील वीरवस्ती भागा जवळील सामाजिक वनीकरणातून काटेरी झुडपे काढुन नीरा नदीत उतरण्यासाठी प्रशस्त रस्ते तयार केले आहेत. एवढेच काय तर नदीतील काढलेली वाळूचा साठा याच वनीकरणात मोठ्या प्रमाणात आहेत. या भागातील साठे जरी सापडले तरी “तो मी नव्हे’ म्हणुन हे वाळू माफिया हात वर करतात. हे साठलेले वाळुचे साठे दररोज पहाटे विना नंबरच्या टिपरच्या माध्ममातून गावातून सुसाट वाहतूक होत असते. सन 2018 किंवा त्या आगोदरही इंदापूर तहसील कचेरीकडून कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही. एवढेच काय तर पोलीस यंत्रणेच्या संबंधीतांकडून हप्ते वसुल केली जाते, यामुळे या ही मंडळींचा नदीवर वावर असतो. महसूल असो की पोलीस यंत्रणेतील भ्रष्ट मंडळींमुळे चांगले चांगले अधिकारी बदनाम होत आहेत. दरम्यान, इंदापूरचे तहसीलदारांचा स्वच्छ कारभाराचा दरारा तालुक्‍यात नव्हे तर जिल्ह्यात आहे मात्र, निमसाखर व खोरोची भागात धाक उरला नसल्याची चर्चा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)