वार्षिक सभेत कोपरगाव बाजार समितीची टांगली लत्कारे

कांदा व्यापाऱ्यांच्या मनमानीला शेतकरी वैतागले
कोपरगाव – कोपरगाव कृषि उत्पन्न बाजार समितीची 12 वी वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यापाऱ्यांच्या मनमानीपणमुळे तालुक्‍यातील शेतकरी वैतगला आहे. परिणामी तो इतर तालुक्‍याकडे आपला शेतमाल विकण्यासाठी जात असल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. बाजार समितीला 5 महिन्यात तब्बल 10 लाख रुपयांचा तोटा झाल्याचे यावेळी ताळेबंदावरून स्पष्ट झाले.
बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.सभेमध्ये एकुण 4 विषय होते. ते सर्वांनुमते मंजुर करण्यात आले. बाजार समितीला केवळ 5 महिन्यात तब्बल 10 लाख रूपयांचा तोटा झाला,अशी खंत रक्ताटे यांनी व्यक्त करून येत्या काही दिवसात योग्य त्या सुधारण करून शेतकरी हिताचे निर्णय घेत बाजार समिती आर्थिक सक्षम करण्यासाठी प्राध्यान्य देणार असल्याचे कबुली रक्ताटे यांनी दिली. या सभेला उपसभापती राजेंद्र निकाले, संचालक भरत बोरणारे, अजित लोहाडे, नानासाहेब गव्हाणे, मधुकर टेके, नगरसेवक शिवाजी खांडेकर, माजी नगराध्यक्ष पद्‌माकांत कुदळे, माजी सभापती मच्छिंद्र केकाण, सुनील देवकर, केशव भवर, सुभाष दवंगे, माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे, राजेंद्र खिलारी यांच्यासह अनेक कार्यकर्ते, शेतकरी, संचालक उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी बाजार समितच्या ढिसाळ कारभारावर व काही कांदा व्यापाऱ्यांच्या मनमानीपणावर आक्रमक पवित्र घेतला. 14 कांदा व्यापारी या बाजार समितीच्या आर्थिक नुकसानीत जबाबदार आहेत. नवीन चांगल्या व्यापाऱ्याला विरोध करून आपली मनमानी करीत असल्याचा आरोप राजेंद्र खिलारी यांनी केला. संजय काळे म्हणाले की, महाशिवरात्रीच्या दिवशी बाजार समितीच्या मैदानात कत्तल करण्यासाठी 380 जनावरे सापडतात. त्या प्रकरणात बाजार समितीचा ढिसाळ कारभार समोर येतो. जनावराच्या बाजारात पावती फाडण्याचा घोळ आहे. वार्षिक हिशोबात नाममात्र रक्कमचा दाखल्याचे निदर्शनास आणुन देत या कामात पारदर्शकता आणावी, अशा सुचना दिल्या.
शासनाच्या सोयाबीन अनुदानांपासुन काही शेतकरी बनावट पावत्या असल्याच्या कारणावरून वंचित राहिले. याचा अर्थ शेतकऱ्यांना त्यांच्या विकलेल्या मालाच्या पावत्या व्यापारी बनावट देवून फसवित आहेत तर ही फसवणुन शेतकऱ्याबरोबर सरकारची फसवणुक करीत आहेत. बाजार समितीचे नियमामध्ये काम होत नाही असेही ते म्हणाले. यावेळी सुनिल देवकर यांनी बाजार समितीसाठी लागणारी नविन जागा खरेदी करण्यापेक्षा जुने तालुका कृषि कार्यालयाच्या ठिकाणची जागा शेतकऱ्यांसाठी आहे. त्या ठिकाणी नवीन मार्केट सुरू करण्याची सुचना मांडली. त्यास राजेंद्र खिलारी यांनी अनुमोदन दिले.
काही व्यापारी 15 रूपये हमालीच्या नावाखाली नियमापेक्षा जास्त पैसे घेतात. जनावरांच्या बाजारात दलाली व सावकारी जोरात चालते. यावर त्वरीत ठोस निर्णय घेण्याची सुचना सुभाष दवंगे यांनी केली. बाहेरचे अथवा नवीन चांगले व्यापारी येत असतील तर जुन्या काही व्यापाऱ्यांनी त्याला विरोध शेतकऱ्यांची अडवणुक करू नये. एकेकाळची सर्वात मोठी बाजार समिती आज बंद पडण्याच्या स्थितीत आली आहे, अशी खंत केशव भवर यांनी व्यक्‍त केली.
शेतकऱ्यांच्या तक्रारींना सभापती रक्ताटे, संचालक भरत बोरणारे यांनी उत्तरे देवुन शेतकरी हितासाठी तालुक्‍यातील नेत्यांनी बाजार समितीची ही सहमती एक्‍सप्रेस सुरू केल्याचे सांगितले. या सभेच्या कामकाजासाठी सचिव परसराम शिनगर, सहसचिव नानासाहेब रणशुर, विष्णु पवार, संतोष कोपरे आदींनी सहकार्य केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)