वारूळवाडीतील मंडल कृषी कार्यालयाची दुरवस्था

नारायणगाव- जुन्नर तालुक्‍यातील 35 गावांतील शेतकऱ्यांना शेतीचे विविध तंत्रज्ञान आणि माहिती देणाऱ्या वारूळवाडी येथील मंडल कृषी कार्यालय आणि इमारतीची दुरावस्था झाली असून, इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वारूळवाडी (ता. जुन्नर) येथे कृषी विभागाचे बहुउद्देशीय कृषी तंत्रज्ञान प्रसार केंद्र 5 मार्च 1999 मध्ये बांधण्यात आले. या इमारतीला 19 वर्षे झाली आहेत. या केंद्रातर्गत नारायणगाव, वारूळवाडी, खडद, मांजरवाडी, पिंपळवंडी, येडगाव, सावरगाव अशी 35 गावे येतात. या केंद्रांतर्गत शेतीशी निगडित शेतकऱ्यांना शेतीचे विविध तंत्रज्ञान आणि माहिती देण्याचे कार्य चालते. कार्यालयात मंडल कृषी आधिकारी, 2 कृषी पर्यवेक्षक, 12 सहाय्यक पर्यवेक्षक असे आधिकारी आणि कर्मचारी आहेत. सध्या या कार्यालयातील मंडल कृषी आधिकारी पद रिक्त आहे. त्यांचा कार्यभार ओतूर येथील मंडलकृषी अधिकारी आर. एन. कोटकर यांच्याकडे आहे. अशा या महत्त्वाच्या कार्यालयाची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात इमारतीवरील पत्र्यातून कार्यालयात पाणी गळते, प्रवेशद्वारावर असलेल्या पायऱ्या तुटल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या एका बाजूला असेल्याच्या भिंतीमध्ये मोठी झाडे वाढल्याने इमारतीला मोठा तडा गेला आहे. ही झाडे काढली गेली नाहीत तर भविष्यात इमारतीचा पूर्वेकडील पूर्ण भाग कोसळण्याची शक्‍यता आहे. या ठिकाणी अनेक शेतकरी, आधिकारी, कर्मचारी कामासाठी येत असतात. अशावेळी ही भिंत पडून दुर्घटना होऊ शकते.

  • सार्वजनिक विभागाकडून प्रतिसाद नाही
    या संदर्भात जून 2018 पर्यंत कार्यरत असलेले तत्कालीन मंडल कृषी आधिकारी कोळेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, इमारतीची दुरवस्था झाली असून, त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी 2017 साली इमारतीच्या दुरुस्तीचे पत्रव्यवहार करून दुरुस्तीचे इस्टिमेट प्रस्ताव तयार करून देण्याची मागणी केली आहे; पण सार्वजनिक विभागाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने दुरुस्ती रखडली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)