वारूंजी फाट्यावर भरदिवसा घरफोडी

कराड, दि. 27 (प्रतिनिधी) – वारूंजी फाटा ता. कराड येथे चोरट्याने शुक्रवारी भर दुपारी बंद घराचे कुलूप तोडून मौल्यवान ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
प्राथमिक शिक्षक कृष्णात फल्ले हे पत्नी व त्यांच्या मुलांसमवेत वारूंजी फाटा येथे राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. शुक्रवारी फल्ले पती-पत्नी घराला कुलूप घालून नेमणूकीच्या ठिकाणी असलेल्या शाळेत गेले होते तर मुले त्यांच्या शाळेला गेली होती. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे फल्ले यांची पत्नी घरी आली. तेंव्हा घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात गेल्यानंतर कपाटातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त पडल्याचे व कपाट उघडे दिसल्यानंतर चोरीचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. या चोरीची माहिती कृष्णात फल्ले यांनी शहर पोलिसांना दिली. सायंकाळी शहर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी सुरू केली होती. या घटनेची नोंद रात्री उशीरापर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती, त्यामुळे नेमका किती ऐवज चोरी झाला हे समजू शकले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)