वाराणसी पुल दुर्घटना : सात अभियंते आणि एका कंत्राटदाराला अटक

लखनौ – गेल्या मे महिन्यात वाराणसी येथील फ्लायओव्हर कोसळण्याची दुर्घटना घडली होती. त्यात पंधरा जण ठार झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी सात अभियंते आणि एका कंत्राटदारांना अटक केली. राउरकेला येथील सेंट्रल बिल्डींग रिसर्च इन्स्टिट्युट येथील तज्ज्ञांकडून पुलाच्या दुर्घटनेची तांत्रिक पहाणी करण्यात आली तसेच संबंधीत अभियंत्यांच्या विरोधात तांत्रिक पुरावे गोळ्या करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर अटकेची ही कारवाई करण्यात आली आहे.

या पुल उभारणीत अनेक त्रुटी राहिल्या आहेत. त्या संबंधात या अभियंत्यांना समोर बोलावून त्यांच्याकडे चौकशी करून त्यात ते दोषीआढळल्याने त्यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक ओ पी सिंह यांनी सांगितली. या प्रकरणात उत्तरप्रदेश सरकारच्या ब्रिज कार्पोरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रंजन मित्तल यांचीही बदली करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)