वारकरी महिलांना चिरडणारा टेम्पो चालक जेरबंद

पिंपरी – मोशी येथे टेम्पोच्या धडकेत दोन वारकरी महिलांना चिरडून जाणाऱ्या अज्ञात टेम्पो चालकाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे.

पांडूरंग बबन पानमंद (वय-42, रा. राजगुरुनगर, खेड) असे अटक केलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. मोशी येथे 4 जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता एका अज्ञात टेम्पोच्या धडकेत जनाबाई अनंता साबळे (वय-55, रा. परळी,बीड), सुमनबाई वैजनाथ इंगोले (वय-60, रा. परळी, बीड) या दोन महिलांना टेम्पो चिरडून निघून गेला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हा अपघात पहाटे झाल्याने पोलिसांच्या हाती कोणताही सुगावा नव्हता. मात्र पोलिसांनी यासाठी सीसीटिव्हीच्या माध्यमातून चाकण, मोशी, कुरळी या भागातील सुमारे 206 वाहने तपासली. यातून संशयीत पांडूरंग याला पोलिसांनी अटक केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)