“वायसीएम’ प्रशासनाचा निषेध

पिंपरी – महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांना योग्य रुग्णालयीन सुविधा मिळत नाहीत. महापालिका आणि रुग्णालय प्रशासन रुग्णांना योग्य सुविधा देण्यासाठी कमी पडत आहे. याबाबत पिंपरी-चिंचवड शहर भारिप बहुजन महासंघच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

आंदोलनासाठी अध्यक्ष देवेंद्र तायडे, महिलाध्यक्षा लता रोकडे, गुलाब देवराम पानपाटील, युवक अध्यक्ष राजेंद्र मगर, रजनीकांत क्षीरसागर, राहुल शितोळे, अंकुश कानडी, कैलास वाघमारे, भगवान पारे, आकाश डोंगरे, विष्णू सरपते, रमेश गायकवाड, राहुल शिंदे, रघुनाथ आव्हाड, दशरथ शिंदे, बहुजन प्रतिष्ठान अध्यक्ष विजय साळवे, सुधाकर सूर्यवंशी, मिलिंद कांबळे, विनायक निंबाळकर, मधुकर शेलार, भागवत सोनकांबळे आदी उपस्थित होते.
भारिप बहुजन महासंघाच्या वतीने डॉ. पवन साळवी यांना निवेदन देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या निवेदनात म्हटले आहे की, वायसीएम रुग्णालयावर प्रशासनाचे नियंत्रण नाही. रुग्णालयात वेळेवर औषध पुरवठा वेळेवर होत नाही. त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार होत नाही. रुग्णालयातील सुविधांचा दर्जा ढासळला आहे. रूग्णालयातील अधिकारी व कर्मचारी रुग्णांच्या नातेवाईकांशी उद्धट वर्तन करतात. अशा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. बहुतांश वेळेला प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना “आयसीयू’मध्ये जागा नसल्याने सामान्य वॉर्डमध्ये उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे आयसीयू वॉर्डची क्षमता वाढविणे आवश्‍यक आहे. तातडीच्या रुग्णांचे केसपेपर तात्काळ मिळण्याची व्यवस्था करावी. रुग्णांना ड्रेसकोड करावा. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)