“वायसीएम’ला महापौरांची “मात्रा’ लागू

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाला (वायसीएमएच) महापौर राहुल जाधव यांनी आठवड्यापूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भेट दिली होती. या भेटीनंतर रुग्णालयातील गैरसोय अनेकांच्या निदर्शनास आली होती.

रुग्णालयातील तातडीने सुधारणा करण्यासाठी त्यांनी सतत बैठका घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. महापौरांच्या रुग्णालयातील भेटीनंतर गेल्या दोन दिवसांपासून सतत साफसफाई सुरु असून अनेक डॉक्‍टरांनी दिवस-रात्रं रुग्णालयात ठाण मांडल्याचे दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील महापालिकेचे वायसीएम रुग्णालय सुसज्ज असून जिल्हाभरातून नागरिकांची सतत वर्दळ असते. परंतु, रुग्णालयातील गैरसोईने अनेकांना त्रासलेले होते. तसेच, सध्या थंडीच्या दिवसात रुग्णालयातील अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनाही मनस्ताप सहन करावा लागत होता. या दिवसात नातेवाईकांना राहण्याची मोठी गैरसोय होत होती. तसेच, रुग्णालयात कित्येकदा डॉक्‍टर जागेवर नसल्याने रुग्णांना फटका बसलेला आहे.

रुग्ण व नातेवाईकांची सतत होत असलेल्या गैरसोईची दखल घेऊन महापौरांनी रुग्णालयाला भेट देऊन सुधारणा करण्याची तंबी दिली होती. यामुळे, गेल्या दोन दिवसापासून रुग्णालयातील प्रत्येक विभागाची साफसफाई, रंगरंगोटी, लसींची उपलब्धता, सुरक्षा व्यवस्था अशा विविध प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

वायसीएम रुग्णालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. रुग्णालयाला भेट दिल्यानंतर अनेक गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत. रुग्णालयात बाहेरगावच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने नातेवाईकांची राहण्याची गैरसोय होते. यासाठी, रुग्णालयातील एका प्रशस्त हॉलची सोय करण्यात येणार आहे.
– राहुल जाधव, महापौर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)