“वायसीएम’मध्ये नवीन “एमआरआय’ मशीन

पिंपरी – वायसीएम रुग्णालयातील एमआरआय सेंटरमध्ये नवीन मशीन बसविण्यात येणार आहे. या मशीनचे एक वर्षासाठी संचालन करणे सध्या चालू असलेल्या मशीनचीही देखभाल करण्याचे काम रुबी एलकेअर यांना देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील एमआरआय सेंटर रुबी एलकेअर यांना सन 2011 पासून 5 वर्ष कालावधीसाठी चालविण्यास देण्यात आले आहे. या एमआरआय सेंटरमध्ये आणखी एक टेस्ला मशीन बसविण्यात येणार आहे. तसेच दहा वर्षासाठी ती संचलनासाठी देण्यात येणार आहे. याशिवाय सध्या चालू असलेल्या मशीनचीही देखभाल करण्याचे काम देण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या निविदा प्रक्रियेमध्ये पाच निविदाधारकांनी सहभाग नोंदवला होता. निविदाधारकांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सहभागी झालेले सर्व निविदाधारक तांत्रिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत का? याची तपासणी करुन दराचे पाकीट उघडण्यात आले. यामध्ये रुबी एलकेअर सर्व्हिसेस यांनी निविदा दरापेक्षा 54 टक्के कमी म्हणजे 7 हजार 291 रुपये दर सादर केला होता. त्यानुसार आता एमआरआय सेंटरमध्ये नवीन टेस्ला मशीन बसवणे दहा वर्षासाठी तिचे संचलन करणे व देखभाल करण्याचे काम रुबी एलकेअर यांना देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)