वादग्रस्त ‘डाऊरी कॅलक्युलेटर’ वेबसाईटवर कारवाईची मागणी

नवी दिल्ली : हुंडा देणं आणि घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे. हुंडा प्रथा कायद्याने पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुलाचा व्यवसाय, त्याचा पगार, जात, नोकरी पाहून त्याच्या कुटुंबियाने किती हुंडा आकारावा हे सांगणाऱ्या ‘डाऊरी कॅलक्युलेटर’ नावाच्या वेबसाईटने एकच खळबळ माजवली आहे. अशा प्रकारच्या वेबसाईवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी केली आहे. काँग्रेस नेता ज्योतिरादित्य सिंधिया यांनी अशा प्रकारची वेबसाईट अस्तित्त्वात आहे आणि त्यावर तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी पतंप्रधान कार्यालय आणि महिला आणि बालविकास मंत्रालयाकडे केली आहे.

Dowrycalculator.com या वेबसाईटवर मुलाबद्दल काही माहिती अपलोड केली की वधूपक्षाकडून किती हुंडा आकारला पाहिजे याचा आकाडा दिसतो. नवरदेवाचा व्यवसाय, त्याचं वय, रंग, उंची, पगार, जात, राहण्याचे ठिकाण यासारखी माहिती साईटवर अपलोड केल्यानंतर किती हुंडा आकारावा याचा आकडा साईटवर देण्यात येतो. अशा प्रकारची वेबसाईट असणे हेच खूपच भयंकर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकीकडे हुंडाप्रथा ही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. हुंडा देणे आणि घेणे हा कायद्याने गुन्हा आहे. पण, दुसरीकडे ही वेबसाईट मात्र लग्न करणाऱ्या तरुणांना त्यांच्या कुटुंबियांना चुकीची दिशा दाखवत आहे म्हणूनच या वेबसाइटवर बंदी आणावी, तसेच अशा प्रकारची वेबसाईट सुरू करणाऱ्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी ज्योतिरादित्य यांनी केली आहे. या संदर्भात मेनका गांधी यांनी कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांना पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)