वाणेवाडीत वीरपत्नींचा सत्कार

सोमेश्‍वरनगर परिसरात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा

करंजे – सोमेश्‍वरनगर परिसरात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाणेवाडी येथील राजराजे कार्यालयात बारामती तालुक्‍यातील 150 आजी माजी सैनिकांचा तसेच वीरपत्नींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सोमेश्‍वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, दूध संघाचे संचालक कौस्तुभ चव्हाण, राहुल वाबळे, तुषार कोकरे, निवृत्त सुभेदार यशवंतराव माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सोमेश्‍वर विद्यालयात संचालक महेश काकडे आणि किशोर भोसले, मुगटराव काकडे महाविद्यालयात बाळासाहेब जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे, उपप्राचार्य प्रा. जगन्नाथ साळवे, आनंद जगताप यांच्यासह व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक उपस्थित होते.
निंबुत ग्रामपंचायत येथे जिल्हा परीषद सदस्य प्रमोद काकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच राजकुमार बनसोडे, उपसरपंच उदय काकडे, ग्रामसेवक सचिन लिंबरकर यांच्यासह सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मुरुम ग्रामपंचायतीमध्ये सरपंच इंदुमती भगत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपसरपंच निलेश शिंदे, पंचायत समिती सदस्या निता फरांदे, सर्व सदस्य, ग्रामसेवक डी.जी. लोणकर, ग्रामस्थ उपस्थित होते. साळोबावस्ती प्राथमिक शाळेत माजी सैनिक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सुनिल पवार, मनिषा पिसाळ यांच्यासह कौस्तुभ चव्हाण आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
वाणेवाडी ग्रामपंचायत येथे सरपंच स्मिता काकडे, उपसरपंच संजय जगताप, ग्रामसेवक पी. डी. गाढवे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.वाघळवाडी येथे सरपंच नंदा सकुंडे, उपसरपंच जितेंद्र सकुंडे, सतिश सकुंडे, उद्योजक आर.एन. शिंदे, सुत्रेचा साळवे उपस्थित होते. करंजेपूल येथे सरपंच वैभव गायकवाड, उपसरपंच सुनिता गायकवाड, आंतरराष्ट्रीय खेळाडू जगन्नाथ लकडे, अनिल शिंदे, ऍड. गणेश आळंदीकर, बाळासाहेब शेंडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. सोरटेवाडी येथे सरपंच दत्तात्रय शेंडकर, उपसरपंच लंका सोरटे, ग्रामसेवक अवंतिका चव्हाण, मधुकर सोरटे आणि मुख्याध्यापक सर्जेराव नरुटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. करंजे येथे सरपंच जया गायकवाड,उपसरपंच कालिदास सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष विकास भंडलकर, ग्रामसेवक संजय भोसले,सर्व सदस्य, मान्यवर व सोमेश्वर करखण्याचे संचालक विशाल गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)