वाढेफाटा येथील रस्त्यावर मोठी चर

वाढेफाटा : चौकातून वाढे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या मधोमध पडलेली मोठी चर. (छाया : संजय कारंडे)

संबंधित विभागाचे दुर्लक्ष, वाहनधारकांमधून संताप
सातारा, दि. 29 (प्रतिनिधी) – महामार्गाला जोडणाऱ्या वाढेफाटा येथे रस्त्यावर काही दिवसांपासून मोठी चर पडली आहे. त्यातूनच वाहने धोकादायक स्थितीत येत-जात असतात. धोकादायक चरीमुळे हा रस्ता अपघातप्रवण ठरु लागला आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांसह स्थानिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सातारा शहराला जोडणाऱ्या वाढे फाटा येथील रस्त्यावर पडलेला खड्ड्याने विस्तार वाढविल्याने या खड्ड्याचे चरीत रुपांतर झाले आहे. त्यामुळे वाढे गावाकडे जाणारी आणि येणारी वाहने या चरीमध्ये आदळत आहेत. बऱ्याचवेळा या ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या तसेच किरकोळ अपघाताच्या घटनादेखील घडल्या आहेत. मात्र, तरीही संबंधित विभागाने या चरीमध्ये किमान मुरुम भरण्याचेसुद्धा कष्ट घेतलेले नाहीत. दिवसेंदिवस हा खड्डा वाढतच असल्याने वेळीच याठिकाणी मुरुम अथवा खडी टाकून डांबरीकरण करण्याची आवश्‍यकता आहे.
फलटण, बारामतीला जाणाऱ्या वाहनांसाठी वाढेफाटा मार्गाचाच वापर करावा लागतो. तसेच या रस्त्याने नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे.
वाहनांचा होतोय खुळखुळा
वाढे फाटा मुख्य चौकात पडलेल्या मोठ्या चरीत वाहने आदळत आहेत. त्यामुळे प्रवाशांसह वाहनधारक हैराण झाले आहेत. त्याशिवाय वाहने या खड्ड्यात आदळत असल्यामुळे वाहनांचाही खुळखुळा होत आहे. वाहनांचा नुकसान होत असल्याने वाहनधारकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)