वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच “अथर्व’ने घेतला जगाचा निरोप

श्रीगोंदा – श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल केशव व्हरकटे यांचा एकुलता एक मुलगा असलेल्या अथर्व (वय 5 वर्ष) चा गाडीवरून पडल्याने मृत्यू झाला. अथर्वला नुकतेच पाच वर्षे पूर्ण झाली. त्याचा वाढदिवस झाला त्याच्या दुसऱ्या दुवशीच ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, अथर्वचा शनिवारी मोठ्या धुमधडाक्‍यात वाढदिवस साजरा झाला. पै-पाहुण्यांच्या मांदियाळीत स्नेहभोजन झाले. रविवारी गणेश विसर्जन मिरवणुकीत केशव व्हरकटे बंदोबस्ता कामी शहरात होते. अथर्वने वडिलांकडे विसर्जन मिरवणूक पाहण्याच हट्ट धरला. मात्र बंदोबस्त सोडून जाता येत नसल्याने त्यांनी त्यांच्या मेव्हण्यास (अथर्वच्या मामास) सांगितले अथर्वला मिरवणूक दाखव.राहत्या घरून (शिवाजीनगर, श्रीगोंदा) अथर्वला त्याचा मामा गावात घेऊन निघाला.दुचाकीवर अथर्व व त्याचा मामा दोघे बसले. मात्र गाडी चालू होतं नसल्याने अथर्वच्या मामाने दुचाकीवरून उतरून किक मारली. मामाने किक मारण्यात अन्‌ अथर्वने रेस करण्यात एकच वेळ झाल्याने दुचाकीसह अथर्व समोरील भिंतीला जाऊन धडकली.
अथर्वच्या छातीला जबर मार लागला. कुटुंबीयांनी तात्काळ केशव यांना फोन करून घटना कळविली. केशव व्हरकटे यांनी तात्काळ अथर्वला दौंड येथील रुग्णालयात नेले. डॉक्‍टरांनी दुसरीकडे नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर नगरला नेण्याचा कुटुंबीयांनी निर्णय घेतला. नगरला खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्‍टरांनी अथर्वचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. अथर्वच्या पार्थिवावर व्हरकटे वाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधी प्रसंगी उपस्थितांना आपले आश्रू थांबवता आले नाही.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

मम्मी मला मॅगी देणार ना..? अथर्वचे शेवटचे उद्‌गार
अथर्वला दौंडला रुग्णालयात नेताना,तो त्याच्या पप्पांना पोटात दुखत असल्याचे सांगत होता. दौंडवरून नगरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. गाडीत जाताना सुद्धा तो पोटात खूप दुखतंय असे बोलायचा. अरणगाव जवळ असताना अथर्वला त्याच्या आई – वडिलांनी सांगितलं “आपण नगरला गेलो की दुखायचे थांबेल’. त्यानंतर अथर्व त्याच्या आईला म्हटला मम्मी घरी गेल्यावर मला मॅगी बनवून देणार ना.? त्यानंतर त्यास जोरात गुचकी लागली. अन दुर्दैवाने अथर्वचे हेच शेवटचे उद्‌गार ठरले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)