वाढदिवसाचा खर्च टाळून आश्रमशाळेला दोन खोल्यांची मदत 

बापूसाहेब गोरेंचा विधायक उपक्रम
श्रीगोंदे – वाढदिवसाचा खर्च टाळून त्या रकमेतून घरगाव (ता. श्रीगोंदा) येथील आश्रमशाळेला दोन खोल्या बांधून देण्याचे विधायक पाऊल येथील माजी नगरसेवक बापूसाहेब गोरे यांनी उचलले आहे.
घरगाव येथे निवासी आश्रमशाळा आहे. तेथे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. अतिशय खडतर स्थितीत पोपट खामकर व त्यांच्या पत्नीने ही आश्रम शाळा सुरू ठेवली आहे. त्यांना कोणतीही सरकारी मदत किंवा अनुदान मिळत नाही. कर्ज काढून हे दांपत्य मुलांचा सांभाळ करत आहे. या आश्रम शाळेची दुरवस्था समजल्यानंतर बापूसाहेब गोरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. वाढदिवसाचा संभाव्य खर्चातून घरगावच्या वरील शाळेला दोन सुसज्ज खोल्या बांधून देण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला. माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी खोल्यांचे भूमिपूजन देखील पार पडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री पाचपुते होते. यावेळी नगराध्यक्ष मनोहर पोटे, माजी नगराध्यक्षा छायाताई गोरे, सुनीता शिंदे, पंचायत समितीचे सभापती पुरुषोत्तम लगड, पोपटराव खेतमाळीस, नगरसेवक नानासाहेब कोथिंबीरे, अशोक खेंडके, दादा औटी, अशोक आळेकर, बाळासाहेब महाडिक, सतीश मखरे, संतोष खेतमाळीस, सुरेश भंडारी, सुनील वाळके, संतोष क्षीरसागर, शाहजी खेतमाळीस, दीपक शिंदे आदी नेते उपस्थित होते.
पाचपुते म्हणाले, श्रीगोंद्याचे नगराध्यक्ष पद गोरेंकडे असताना व नसतानाही सामाजिक कार्यात हे कुटुंब नेहमीच अग्रेसर असते. गोरे यांचा हा अनोखा उपक्रम सर्वांसाठी एक आदर्श आहे. घरगाव येथील आश्रम शाळेसंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. खामकर दाम्पत्यांचे विदारक दृश्‍य आपण त्यांच्या कानी घातले. त्यावर ते लवकरच सकारात्मक निर्णय घेतील.
राजकीय महत्त्वकांक्षा उरली नाही : गोरे
सत्काराला उत्तर देताना गोरे म्हणाले, पाचपुतेंमुळे माझ्या वहिनी नगराध्यक्षा झाल्या. माझ्या वडिलांनी श्रीगोंदा शहरात कावडीने पाणी पुरविले होते. आमच्या घरात नगराध्यक्षपद असताना श्रीगोंद्यासाठी साठ कोटींची नळ योजना आली. आमच्या हातून हे काम पूर्ण होण्यासाठी पाचपुतेंनी आम्हाला मुदतवाढ दिली. आगामी पालिका निवडणुकीत उमेदवारी द्या अगर देऊ नका आम्ही निष्ठा बद्दलणार नाही. आता राजकीय महत्त्वाकांक्षा उरली नाही. जे मिळाले त्यात समाधानी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)