वाढत्या उकाड्यावर वळीव घालणार फुंकर

राज्यभरात आजपासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

पुणे – गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेने कहर केला आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत चंद्रपूर येथे 46.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. दरम्यान, या वाढत्या उष्णतेमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. शनिवारपासून राज्यात वळवाचा पाऊस बरसणार असल्याची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.

मध्य प्रदेश ते उत्तर कर्नाटक या दरम्यान असलेला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे. तर उत्तर प्रदेशाच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती असून, अरबी समुद्रात परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याचे रुपांतर चक्राकार वाऱ्यांमध्ये होण्याची शक्‍यता आहे. गुजरातच्या परिसराही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होईल. त्यामुळे पूर्वमोसमी पावसासाठी आवश्‍यक असलेले वातावरण तयार होत आहे. राज्यात शनिवारी काही अंशी हवामान ढगाळ राहणार असून, राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडण्याचे संकेत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.