वाड्या-वस्त्यांवर ज्येष्ठांसह युवकांचे श्रमदान

रेडा- ग्रामीण भागात भलरी म्हणत शेत फुलवणारा शेतकरी, आपले गाव परिसर पाणीदार करण्यासाठी भल्या पाहटे भलरी दादा… भलरी शेतीचे गीत गात, काटी (ता. इंदापूर) या गावातील वाड्यांवस्तीवर तुफान श्रमदानाला सुरवात झाली आहे.
रविवार हा सुट्टीचा दिवस शासकीय अधिकारी यांचा असतो मात्र, हा दिवस वाया न घालवता काटी गावातील कृषी विभागात काम करणारे अधिकारी, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक व इतर शासकीय सेवेत काम करणारे तसेच गावकऱ्यांनी दत्तवाडी (काटी) या परिसरात बांध बंदिस्त व कंपारटमेंट बल्डींग काम पहाटे साडेपाचच्या सुमारास भलरी गीत गात सुरू झाले. आदर्श शेतकरी म्हणून प्रगत शेती करणारे साहेबराव मोहिते यांनी भलरी खड्या आवाजात गायली, भलरी… भलरी… म्हणत हातातील खोरे, टिकाव व फावडे वेगाने श्रमदानाला साथ देत होते. ऐरवी श्रम न करणारे अधिकाऱ्यांचे हात वाऱ्याच्या वेगाने खादणी व माती उचलणी करत होते. पहाटेच्या प्रहरात शांत वातावरण व गारवा यामुळे काही तासातच नियोजित काम मार्गी लागले. यात ज्येष्ठांसह युवकांनी श्रमदान केले. तर गावात श्रमदान वाढावे यासाठी स्नेहभोजन, वनभोजन प्रभागनिहाय करण्यासाठी नियोजन आखण्यात आले, तर काहि गावकऱ्यांनी सकाळी व्यायामाला न जाता श्रमदान करूया व आपले गाव पाणीदार करूया असाही संकल्प केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)