वाठार-वाई रोडवरील खाऱ्या पुलावर डांबरीकरणाची गरज

वाठार स्टेशन – वाठार स्टेशन वाई रस्त्यावर ब्रिटिश काळातील वयोमर्यादा संपलेला खारा नावाचा पूल होता. गेल्यावर्षी महाड येथील सावित्री नदीवरील पूल दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग आली व खाऱ्या पुलाचे नशीब उचकटले.
सदरचा पूल मोडकळीस आल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या खाऱ्या पुलाचे नूतनीकरण करून नवीन पूल बांधला. तसेच या पुलाचे बांधकाम करून एक वर्ष होऊन गेले तरीही या पुलावर अजून पर्यंत डांबरीकरण करण्यात आले नाही.

सदरचा रस्ता पोलादपूर पंढरपूर राज्य मार्ग असल्यामुळे येथील पुलावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पुलाच्या आजूबाजूस खडी विस्कटलेली आहे, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, खडी रस्त्यावर आलेली आहे, या गोष्टीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असून अस्ताव्यस्त पडलेली खडी बाजूला सारत नाहीत, त्याच्यावर मुरूम टाकत नाहीत, या विस्कटलेल्या खडीमुळे दुर्दैवाने एखाद्या अपघात होऊ शकतो. तसेच या सदरच्या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असून जर या पुलावर एखादा अपघात घडला तर याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहणार का? असा प्रश्‍न ग्रामस्थ व वाहनधारकांना पडला आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने सदरच्या पुलावरिल विस्कटलेली खडी बाजूला करून खड्डे भरून डांबरीकरण करून घ्यावे, अशी मागणी वाहनधारक तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)