वाटलूज, नायगावमध्ये कुल गटाचे सरपंच

राजेगाव- दौंड तालुक्‍याच्या पूर्व भागातील वाटलूज आणि नायगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. जनमतातून सरपंच असल्याने सरपंचपदाच्या लढती आमनेसामने झाल्या. वाटलूज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी युवराज बापूराव शेंडगे विजयी झाले. सरपंचपद हे सर्वसाधारण गटासाठी आरक्षित होते. या निवडणुकीत शेंडगे यांना 434 मते मिळाली. ग्रामपंचायतीत दहा सदस्य संख्या आहे. विजयी झालेले सदस्य आणि त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे – नाना कांबळे (267 मते), शारदा कदम (233),गउबाई साधू दोन्हे (282),धुळूदेव रावसो शेंडगे (253),स्वाती पोपट गोफणे (260),पुष्पा नानासो शेंडगे (256), दत्तात्रय काकडे (164), दत्तात्रय चोरमले (203), मोहिनी भांडवलकर (116). नायगाव येथे सरपंच पद हे सर्वसाधारण महिलेसाठी होते. त्या ठिकाणी भारती चांगदेव वाळके यांची सरपंच पदासाठी वर्णी लागली. त्यांना 156 मते मिळाली आहेत. ग्रामपंचाय सदस्य संख्या सहा आहे. विजयी सदस्य आणि त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे – बेबी खंडागळे (46 मते), अनिता पाळेकर (35), योगेश जाधव (34), विठ्ठल पांडव (55), मालन काळे (55). यावेळी नवनिर्वाचित सरपंच युवराज शेंडगे म्हणाले की माझा संपूर्ण वेळ हा गावच्या विकासाठी देईल .गावातील नागरिकांच्या मुलभूत अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करील,शाशकीय योजना नागरिकांना अधिक कसा लाभ मिळेल याकडे अधिक लक्ष देईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)