#वाचा: विवाहपूर्व समुपदेशन ‘का’ आहे महत्वाचे?

मानसी चांदोरीकर

समुपदेशन क्षेत्रात काम करत असताना सध्याच्या काळात प्रामुख्याने दिसून येणारी मोठी समस्या म्हणजे घटस्फोटांची वाढलेली किंवा झपाट्याने वाढत चाललेली संख्या. पूर्वीच्या काळात ही संख्या खूप कमी होती. परंतु, सध्याच्या या काळात मात्र ही संख्या झपाट्याने वाढत चालली आहे आणि त्यामागच्या कारणांचा विचार करताना बऱ्याच केसेसमध्ये असे लक्षात येते की, समायोजनाचा अभाव, अनेक कारणांनी प्रत्येकावरचा वाढत चाललेला ताम आणि स्पर्धेत टिकण्याच्या प्रयत्नात आपल्या जवळच्या लोकांकडे होत चाललेले दुर्लक्ष त्यातून वाढत चाललेले गैरसमज, संवादाचा अभाव व त्यातून वाद विवाद व शेवट घटस्फोट.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नातं कोणतंही असो ते निरोगी ठेवण्यासाठी त्या नात्यात विश्‍वास, प्रेम, आपुलकी आणि मनमोकळा संवाद या चर्तुसूत्रींची अत्यंत आवश्‍यकता असते. नवरा-बायकोच्या नात्याची विण घट्ट होण्यासाठी तर या गोष्टींचा पाया भक्‍कम असणे हे अतिशय आवश्‍यक आहे. कारण लग्न हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. लग्नानंतर प्रत्येकाच्याच आयुष्यात बदल घडतात. हे बदल करणे व स्वीकारणे हे प्रत्येकाला जमले तर समस्या कमी होण्यास निश्‍चितच मदत होते. जर या चार सूत्रांचा वापर प्रत्येक विवाहित जोडप्याने केला तर घटस्फोटाची संख्या कमी होण्यास निश्‍चितच मदत होईल. पण सध्याच्या काळात मात्र असं होताना दिसत नाही. कारण या स्पर्धेच्या युगात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी सिद्ध करण्यासाठी प्रत्येकजण या स्पर्धेच्याच मागे लागला आहे. यातून नवरा-बायकोमधील मोकळा संवादच हरवत चाललाय. हा मोकळा संवाद साधण्यासाठी त्यांच्याजवळ वेळच नाहीये आणि संवादाअभावी नाती घट्ट होत नाहीत.

मित्र मैत्रिणींनो वर म्हणल्याप्रमाणे लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यात मोठे बदल घडवून आणणारी गोष्ट आहे. त्यासाठी योग्य निर्णय घेणे, निर्णय घेताना शक्‍य असल्यास होणाऱ्या जोडीदाराबरोबर मोकळा संवाद साधून, आपापल्या अपेक्षा इच्छा याबाबत मोकळी चर्चा केली, मोकळा संवाद साधला तर पुढे येणारे हे वाईट प्रसंग टाळता येणे सहज शक्‍य आहे. कारण यामुळे एकमेकांच्या इच्छा आधीच कळल्याने त्याबाबतही विचार, संवाद साधता येतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न झाल्यानंतर नवीन परिस्थिती नवीन वातावरण याबरोबर साधावे लागणारे समायोजन.

मुलगा असो वा मुलगी लग्नानंतर दोघांनाही नवीन बदलांशी समायोजन साधावेच लागते. काही गोष्टीत अवर्क्षीीीाशपीं करावीच लागते. हे समायोजन साधता आले नाही तर नात्यात समस्या निर्माण होऊ शकतात. सध्याच्या काळात समुपदेशनासाठी येणाऱ्या जोडप्यांमध्ये या समस्येचे प्रमाणही बरेच अधिक असल्याचे जाणवते. जेव्हा पतीपत्नी समस्या घेऊन येतात आणि त्यांच्याशी समुपदेशनाच्या दृष्टिकोनातून संवाद साधला जातो तेव्हा असे जाणवते किंवा लक्षात येते की दोघांपैकी कोणीच हे समायोजन साधण्यास तयार नसते. समोरच्या जोडीदाराने हे समायोजन साधावे अशी त्यांची अपेक्षा असते. आणि समोरचा जोडीदार ते करत नाही म्हणूनच वाद विवाद होतात असा त्यांचा एकमेकांवर आरोप असतो. दोघांपैकी कोणीच थोडी माघार घेण्यास, समजून घेण्यास तयार नसते आणि यातूनच वाद विकोपाला जातात.

मित्र-मैत्रिणींनो जर आपल्या आयुष्यात म्हणजे वैवाहिक आयुष्यात समस्या उद्‌भवू नये असे आपल्याला मनापासून वाटत असेल तर एक गोष्ट नक्‍की करा, असे समुपदेशक म्हणून सांगावेसे वाटते. ती म्हणजे आपल्या होणाऱ्या जोडीदाराशी किंवा असलेल्या जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधा. कितीही धावपळ असली तरी जोडीदाराला थोडा का होईना आपला असा वेळ द्या. या वेळात तुमच्या अडचणी, समस्या, अपेक्षा यावर मनमोकळे बोला. जोडीदारावर रागावण्यापेक्षा भांडण करण्यापेक्षा त्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपण त्याच्याबरोबर आहोत हा विश्‍वास त्याला द्या.

वाद घालून समस्येत भर घालण्यापेक्षा मोकळा संवाद साधून समस्या सुटते का? ते पहा. यातूनच दोघांमधील नातं घट्ट होण्यास मदत होईल याच बरोबर इतरांना आपल्या नात्यात हस्तक्षेप करू देऊ नका. कारण अनेकदा तेही आपल्यात वाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरू शकतात. आपलं वैवाहिक आयुष्य सुंदर, आनंदी बनविण्यासाठी हे प्रयत्न जरूर करा आणि त्यातूनही समस्या आल्याच तर न घाबरता समुपदेशकांचा सल्ला घ्या. ते तुम्हाला निश्‍चितच मदत करतील आणि तुमच्या आयुष्यातील घटस्फोटासारख्या समस्यांची शक्‍यता दूर होईल.
(केसमधील नाव बदलले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)