वाघोलीत रस्त्यावर गोंधळ घालीत वाढदिवस करणाऱ्यांवर कारवाई

वाघोली- वाघोली (ता. हवेली) येथील बीजेएस महाविद्यालयाजवळ रस्त्यावर आरडाओरडा करीत वाढदिवस साजरा करीत सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर लोणीकंद पोलिसांनी बुधवारी (दि. 26) रात्री कारवाई केली.
पोलीस निरीक्षक प्रताप मानकर गस्त घालीत असताना बीजेएस महाविद्यालयाजवळ काही विद्यार्थी आरडाओरडा करीत वाढदिवस साजरा करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार या नऊ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. सदर विद्यार्थी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे असल्याचे समजते. चारचाकीच्या उफरचा आवाज वाढवून, तलवारीने केक कापणे, गोंधळ घालणे अशा प्रकारात वाढ झाली आहे. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. याकामी तक्रार करण्यास नागरिक धजावत नसल्यामुळे असे प्रकार वाढल्याने पोलीसांनी ही कारवाई करीत चाप बसविला आहे. वाघोली येथील एसटी कॉलनीतील काही कबुतर शौकिकांकडूनही शांतता भंगचा प्रकार होत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.

  • सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
    – प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक, लोणीकंद
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)