वाघोलीत पेशंटसाठी व्हील चेअर, वॉकर विनामूल्य उपलब्ध

वाघोली- वाघोली परिसरातील गरजू पेशंट व नागरिकांसाठी लागणारे व्हीलचेअर, वॉकर, कमोड चेअर आदी विविध साहित्य विनामूल्य पुरविण्यासाठी विवेकानंद रुग्णोपयोगी साहित्य केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. केंद्राचे उद्‌घाटन कोलंबिया हॉस्पिटलचे डॉ. भूषण जोशी व लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉ. ज्ञानोबा भास्कर यांच्या हस्ते करण्यात आले. केंद्र व्यवस्थापक मनोहर बागूल, चंद्रशेखर डोळके, किशोर आपटे, राहुल सिंह, अरुण काशीकर हे सोमवार ते शनिवार सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत नागरिकांसाठी उपलब्ध राहतील, अशी माहिती केंद्रप्रमुख सुजाता कृष्णकांत सातव यांनी दिली. पेशंट आणि नागरिकांसाठी व्हिल चेअर, एअर बेड, वॉटर बेड,वॉकर, कमोड चेअर, ऑक्‍सीजन सिलिंडर, बॅक रेस्ट आदी साहित्य विनामूल्य पुरविले जाणार आहे. वाघोलीतील गरजूंनी साहित्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अनेक नागरिकांकडे पेशंटला उपयोगी व्हील चेअर, वॉकर, कमोड चेअर व विविध साहित्य पडून असतात. ज्या साहित्याचा उपयोग होत नाही, असे साहित्य समाजसेवेसाठी विवेकानंद रुग्णोपयोगी साहित्य केंद्रामध्ये दान करावे, असे आवाहन केंद्र प्रमुखांकडून करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.