वाघोलीत नवमतदारांचा उत्साह कोणाच्या पथ्यावर

शिरूरच्या आखाड्याची चर्चा, अनेकांच्या पैजा

वाघोली- हवेली तालुक्‍यातील वाघोली येथे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदारांचा उत्साह शिगेला पोहचला होता. एकूण 35 हजार 339 (ईडीसीसह) मतदारांपैकी 19 हजार 516 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला आहे. एकूण सरासरी 55.22 टक्‍के इतकी आहे. त्यामुळे ज्येष्ठांसह नवमतदारांचा कौल कोणाच्या पथ्यावर पडणार, याची चर्चा तालुक्‍यात रंगली आहे. शिरूरच्या आखाड्यात आता कार्यकर्ते पैजा लावत असल्याचे चित्र दिसत आहे.

वाघोलीत सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी लांबच्या लांब रांगा लावून हक्‍क बजावला आहे. जुन्या मतदारांसह नवीन मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता पाहावयास मिळाली. वाघोलीत सुशिक्षित मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांचा कौल कोणाच्या पथ्यावर, याची चर्चा रंगली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.