वाघोलीत गरजूंना शालेय साहित्य वाटप

संग्रहित फोटो

वाघोली- वाघोली (ता. हवेली) येथे विष्णुजी शेकोजी सातव हायस्कूलमध्ये विविध उपक्रम राबवत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे विभिमंडळ पक्षनेते अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाघोली (ता. हवेली) येथे कल्याण मंगल कार्यालयात अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हभप भाऊसाहेब गोविंदराव सातव विकास प्रतिष्ठान आयोजित दहावी, बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, तसेच दत्तक आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे संस्थापक शिक्षण महर्षी बाबुराव घोलप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार अशोक पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन घोटकुले, जिल्हा परिषद सदस्या कल्पना जगताप, हवेली तालुका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शांताराम कटके, माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील,
पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र खांदवे, हवेली तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष नंदकुमार काळभोर, अष्टापूरचे माजी सरपंच सुभाष जगताप, सरपंच वसुंधरा उबाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. चंद्रकांत कोलते, शंकर भूमकर, माजी सरपंच शिवदास उबाळे, गणेश सातव, विशाल बहिरट, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे विषेश अधिकारी एन. के. निंबाळकर, डॉक्‍टर्स सेलचे जिल्हा अध्यक्ष शिवदीप उंद्रे, आव्हाळवाडीचे माजी सरपंच रमेश सातव, हेमंत सातव, केसनंदचे माजी सरपंच चंद्रकांत सातव, माजी उपसरपंच कैलासराव सातव, विकास शिंदे, कविता पऱ्हहाड, वैशाली घोगरे, पंढरीनाथ सातव, सुभाष सातव, प्रकाश सातव, अनिकेत सातव, सूर्यकांत सातव, राजेंद्र सातव विद्यार्थी पालक ग्रामस्थ पंचक्रोशीतमधील प्रतिष्ठित नेते मंडळी आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)