वाघोलीतील नवीन पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी पूर्ण

मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांची माहिती

वाघोली- वाघोली गावातील जुन्या व नवीन पाणी योजनेसाठी एकत्रितपणे 1.49 दलघमी पाण्याचे आरक्षण देण्याच्या प्रस्तावातील त्रुटी पूर्ण झाल्या असून पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार असल्याची माहिती जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता ता. ना. मुंडे यांनी दिली. वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या त्रुटी मुख्य अभियंता कार्यालयाकडून पूर्ण केल्या गेल्या असल्याने लवकरच पीएमआरडीएच्या नवीन पाणी योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे.
वाघोली हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या नागरिकीकरणाला सध्या असलेल्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवता येत नसल्याने पीएमआरडीएच्या वतीने वाघोलीसाठी स्वतंत्र योजना करण्यात येणार आहे. 23 कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे टेंडर देखील करण्यात आले आहे. वढू खुर्द येथील बंधाऱ्यातून पाणी उपसा करण्यासाठी पाण्याचे सुधारित आरक्षण आवश्‍यक असल्याने संबंधित आरक्षणाचा प्रस्ताव पीएमआरडीएकडून जलसंपदा विभागाकडे सादर करण्यात आल्यानंतर मुख्य अभियंत्यांकडून कार्यकारी संचालकांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्रस्तावात त्रुटी काढल्यानंतर पुन्हा मुख्य अभियंत्यांकडे प्रस्ताव आला. मुख्य अभियंता कार्यालयाकडून वाघोलीसाठी पूर्वी मंजूर आरक्षण रद्द करण्याची कार्यवाही, वाघोली गावची लोकसंख्या किती व पाणी वापराचा अहवाल व इतर त्रुटी पूर्ण करण्यात आल्या असून प्रस्ताव कार्यकारी संचालकांकडे पाठविण्यात येणार आहे. प्रस्ताव पूर्तीसाठी आमदार बाबुराव पाचर्णे , पीएमआरडीएचे अधिकारी अधिकारी वि. ता. तांदळे, बी. डी. यमगर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, शिवदास उबाळे, संदीप सातव यांनी पाठपुरावा केला आहे

  • वाघोलीची पाणीपुरवठा योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. जलसंपदा विभागाच्या परवानगीनंतर लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. याकामी शिरूर-हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरू आहे.
    – रामभाऊ दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)