वाघोलीच्या वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका

वाघोली- कोणत्याही निधीची वाट न पाहता स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने सध्या वाहतूककोंडीतून नागरिकांची सुटका होण्यास सुरुवात झाली असून वाघोलीसह पुणे आणि नगरकडे ये-जा करणाऱ्या व्यक्तींकडून या उपक्रमाचे कौतूक होत आहे.

 • वाहतूककोंडी सोडविण्यासाठी युवकांची मदत
  वाघोली (ता. हवेली) येथील येथील तरुणांनी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी व्हॉट्‌सच्या माध्यमातून तरुणांनी ग्रुप केले आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून ह्याच ग्रुपमधील सदस्यांकडून जेव्हा जेव्हा वाहतूककोंडी सदृश्‍य परिस्थिती निर्माण होते. त्यावेळेस वाघोली युवक तातडीने त्या त्या चौकामध्ये जाऊन वाहतूककोंडी सोडवताना दिसतात. वाघोली येथील सततची वाहतूककोंडी गेल्या चार दिवसांपासून कमी झाल्याचे चित्र सध्या पहावयास मिळू लागले आहे.
 • बायफ रोडच्या रस्ता सुधारण्यासाठी मदत
  वाघेश्वर मंदिर चौकातून बाईफरोडकडे जाणारा रस्त्या करण्यासाठी पायल ग्राफिक्‍सचे संचालक, उद्योजक संपत गाडे यांनी 2 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. गाडे यांनी दिलेल्या मदतीच्या आश्वासनानंतर बाईफ रोडचे ग्रामस्थ, सोसायटीधारक, माजी सरपंच शिवदास उबाळे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भाडळे, पूजा भाडळे यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे. वाघेश्वर चौकातून बाईफ रोडकडे अनेक वाहने विरुद्ध दिशेने जात असतात. रस्ता सुधारणा झाल्यास वाहनांना पद्धतशीरपणे जाता येईल.
 • खड्डे बुजवण्यात ग्रामपंचायतीचा पुढाकार
  पुणे-नगर महामार्गावर आव्हाळवाडी फाटा ते केसनंद फाटा दरम्यान पावसाच्या पाण्यामुळे रस्ता उखडल्याने पाणी साचून वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. वाघोली ग्रामपंचायतीच्या वतीने या रस्त्यावर खडी टाकून सपाटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविण्यास अडचण येत नाहीत. तसेच वाहतूककोंडी देखील काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाल्याचे उपसरपंच संदीप सातव यांनी सांगितले आहे.
 • पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी वाढविले मनुष्यबळ हवेलीचे उपविभागीय अधिकारी सुहास गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक प्रताप मानकार यांनी वाघोली (ता. हवेली) येथील वाघेश्वर मंदिर चौक, आव्हाळवाडी फाटा चौक, केसनंद फाटा चौक, बकोरी फाटा या ठिकाणी स्वयंसेवी संस्था, पोलीस कर्मचारी, वार्डन यांची नेमणूक केल्याने वाहतूककोंडी कमी झाली आहे. याविरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांवर देखील पोलिसांनी कारवाई करण्याचे धोरण राबवले आहे. त्यामुळे अहमदनगरकडे व पुण्याकडे ये -जा करणारी वाहतूक सध्या सुरळीत सुरु आहे.
 • वाघोली येथील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेकडून 5 कर्मचारी मिळाले आहेत. तसेच ग्रामस्थ, वाघोली ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, लोणीकंद पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. सिग्नल यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार आहे. तसेच विरुद्ध दिशेने ये -जा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
  – सुहास गरुड, उपविभागीय अधिकारी, हवेली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)