वाघांनो… स्वत:चा जीव नका देऊ!

पंकजा मुंडेंची आंदोलकांना भावनिक साद
मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी औरंगाबादमधील आंदोलक काकासाहेब शिंदे या तरूणाने घेतलेल्या जलसमाधीने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पुरत्या हेलावून गेल्या आहेत. महाराष्ट्रातील माझा एक भाऊ “काकासाहेब शिंदे’ याने स्वत:चा जीव गमावला आहे, एका आईच्या पोटचं लेकरू गेलं, तिच्या गळ्यातला ताईत गेला, त्या माऊलींच्या दु:खाची कल्पना ही कोणी करू शकत नाही. कोणत्या घरचा दिवा विझू नये हीच अपेक्षा आहे. त्यामुळे भावानो स्वत:चा जीव नका रे देऊ… आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्याला समोर ठेवा वाघानो… अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी आंदोलकांना भावनिक साद घातली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठवाड्यात आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सोमवारी औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या तरूणाने गोदावरी नदीत उडी मारत जलसमाधी घेतली. तसेच मंगळवारी औरंगाबादमध्ये आणखी आत्महत्येचे प्रयत्न झाले. त्यापार्श्वभूमिवर पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंडे साहेबांनीही केले होते आरक्षणाचे समर्थन
माझ्या राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, याचे समर्थन मुंडे साहेबांनीही केले होते व आम्ही ही करतो. ते मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ओबीसीवर कुठलाही अन्याय झाला नाही पाहिजे ही भूमिका मराठा समाजाची देखील आहे व माझीही आहे, असे त्या म्हणाल्या. हे एकत्र शक्‍य होऊ शकेल असा मला पूर्ण विश्वास आहे. यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करण्यासाठी आम्ही, मुख्यमंत्री व शासन कटिबद्ध आहोत. फक्त धैर्याची आवश्‍यकता आहे, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)